Maharashtra Rain : आजपासून पुढील दोन दिवस कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Rain : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र, पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. तर अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आह. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील दोन दिवस कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळ तिथं पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट

पुढील दोन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

यावर्षी 15 दिवस आधीच मान्सूनचा परतीचा प्रवास

दरम्यान, मुंबईसह ठाणे परिसरात कालपासूनच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. सध्या देखील ढगाळ वातावरण असून, पावसाची शक्यता आहे. गेल्या वर्षी रेंगाळलेला मान्सून (Monsoon) यावर्षी मात्र 15 दिवस आधीच निरोप घेण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरु करेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. एरवी मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरपासून सुरु होतो आणि 30 सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप घेतो. मात्र, यावर्षी 15 दिवस आधीच मान्सून निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

जून महिन्यात दडी मारलेल्या पावासानं जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. यामुळं शेतकरी समाधानी झाले आहे. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर चार जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर 9 जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला आहे. राज्यातला एकही जिल्हा असा नाही की जिथे समाधानकारक पाऊस झाला नाही. राज्याच्या सर्वच भागात समाधनकारक पावसानं हजेरी लावली आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-rain-in-some-places-in-the-state-1095399

Post a Comment

0 Comments