आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्री शिंदेंची दिल्लीत भेट? चर्चांना उधाण

IPS Rashmi Shukla CM Eknath Shinde Meet:  फोन टायपिंग प्रकरणातल्या वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढत चालल्या आहेत. आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची दिल्लीत भेट घेतल्याची चर्चा आहे. नवी दिल्लीत अज्ञात ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रश्मी शुक्ला यांची भेट झाल्याची माहिती आहे.  मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात नसल्यानं बाहेर दोघांची भेट झाली अशी सूत्रांची माहिती आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांनी गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशा चर्चा
रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशा चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाली. सध्या त्या हैदराबादमध्ये सीआयएसएफमध्ये कार्यरत आहेत.

17 ऑगस्ट रोजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, विरोधकांचा आरोप

त्यांनी 17 ऑगस्ट रोजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर असताना भाजप नेते मोहित कंबोजही तिथे पोहोचले होते. त्यामुळे विरोधकांनी यावरून टीकास्त्र सोडले होते. तर शुक्ला यांनी हे आरोप फेटाळले होते.  देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि मी एक पोलीस अधिकारी आहे. त्यामुळे मी फडणवीसांची अधिकृत भेट घेतली. या भेटीचा आणि मोहित कंबोज यांचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया रश्मी शुक्ला यांनी एबीपी माझाला दिली होती.

रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप काय?

- रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे.
- फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते.
- राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

<a class="topic_text" title="Rashmi Shukla : सत्तांतरानंतर रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार?" href="https://ift.tt/ryivNTR Shukla : सत्तांतरानंतर रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार?

<a class="topic_text" title="Balasaheb Thorat : सागर बंगल्यावर वॉशिंग मशीनचं काम चालतं, बाळासाहेब थोरातांचं टीकास्त्र" href="https://ift.tt/4pwxZle Thorat : सागर बंगल्यावर वॉशिंग मशीनचं काम चालतं, बाळासाहेब थोरातांचं टीकास्त्र

source https://marathi.abplive.com/news/india/ips-rashmi-shukla-cm-eknath-shinde-meet-in-new-delhi-1103003

Post a Comment

0 Comments