Girish Mahajan on Shiv Sena : 50 पैकी चाळीस आमदार गेले, 18 पैकी 12 खासदार गेले, यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही, अशी टीका मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) केली आहे. तसेच आता शिवसेना भवनासाठी (Shiv Sena Bhavan) देखील मारामाऱ्या होतील, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर पक्षात उभी फूट पडले. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह काही आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी बंड करत आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. पक्षातील गटनेतेपदासोबतच, पक्ष, पक्षातं चिन्हावरही शिंदे गटानं दावा केला आहे. या संघर्षासंदर्भातील प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे.

आता काही दिवसांनी शिवसेना भवनसाठी मारामाऱ्या होतील : गिरीश महाजन

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बोलताना म्हणाले की, "अडीच वर्षांचा आमचा काळ फुकट गेला. आमच्या पाठीशी शिवसेनेनंच खंजीर खुपसला. आमच्याशी गद्दारी करुन राष्ट्रवादी, काँग्रेसला जाऊन मिळाले. मात्र याचं फळ शिवसेनेला मिळालं आहे. त्यांचे 50 पैकी चाळीस आमदार गेले, 18 पैकी 12 खासदार गेले. आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आता नावासाठी, चिन्हासाठी भांडत आहेत, परवा मैदानासाठी भांडत होते, आता काही दिवसांनी शिवसेना भवनसाठी मारामाऱ्या होतील, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

गिरीश महाजन यांनी जळगावात एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाणचा अनुभव हागणदारी वरून मला आला असून या विषयावर आपली मोठी कोंडी झाल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी ग्रामविकास मंत्री आहे. राज्यात मी सगळीकडे हागणदारी मुक्तीबद्दल लोकांना हगणदारीमुक्त गावं करा, रस्त्यावर कुणीही शौचास बसून नका, याबाबत सांगत असतो आणि माझ्याच तालुक्यात केकतनिंभोरा या गावात रस्त्यालगत एक, दोन नव्हे 50 लोक रस्त्यालगत बसलेले दिसले.", असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

मी राज्यात लोकांना कोणत्या तोंडानं सांगायचं म्हणत गिरीश महाजन यांनी आपल्या डोक्याला हात मारून घेतला. यावेळी सभेत उपस्थितांना हसू अनावर झालं. माझ्या तालुक्यातच जर अशी परिस्थती आहे, तर मी इतरांना काय सांगेन, म्हणून माझी हातू जोडून सर्वांना विनंती आहे, उघड्यावर शौचास बसू नका, हे थांबविण्यासाठी यापुढे मी गांधीगिरी करणार असून रस्त्यावर बसणाऱ्या लोकांना गुलाबपुष्प देणार आहे. स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असं आवाहनही यावेळी गिरीश महाजन यांनी केलं आहे.

source https://marathi.abplive.com/news/jalgaon/now-shinde-group-and-thackeray-group-will-be-fight-for-shiv-sena-bhavan-statement-by-minister-girish-mahajan-bjp-maharashtra-mumbai-1103930
0 Comments