Local Railway Mega Block : आज रविवार 25 सप्टेंबर 2022, मुंबईकरांनो (Mumbai) आज घराबाहेर पडणार असाल तसेच लोकल रेल्वेने (local Railway) प्रवास करणार असाल तर कृपया इथे लक्ष द्या. कारण आज उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) आहे. जाणून घ्या रेल्वेच्या कोणत्या मार्गावर आज मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, जाणून घ्या सविस्तर

अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे 25 सप्टेंबर रोजी म्हणजेच रविवारी उपनगरीय स्थानकांवर मेगाब्लॉक घेणार आहे. या काळात अनेक गाड्यांवर परिणाम होणार आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी, प्रवासी येथून मेगा ब्लॉक दरम्यान प्रभावित होणार्‍या गाड्यांचे तपशील तपासू शकतात. सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत माटुंगा-ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर परिणाम होईल. सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान वळवल्या जातील. सीआरने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, गाड्या त्यांच्या नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा धावतील. तर कल्याणहून सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल, या सेवा ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. या लोकल रेल्वे नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डीएन लोकल नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर मार्गावर या गाड्यांवर होणार परिणाम
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत परिणाम दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणारी Dn हार्बर मार्गिका आणि सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणारी वांद्रे/गोरेगाव डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

source https://marathi.abplive.com/news/mumbai/local-railway-mega-block-sunday-today-know-about-local-train-service-marathi-news-1103622
0 Comments