Radhakrushn Vikhe Patil : सध्या राज्यात लम्पी स्कीन आजाराने (Lumpy Skin Disease) थैमान घातलं आहे. त्यातच जी जनावरं रस्त्यावर मोकळी सोडून दिली आहेत, अशा जनावरांना एखादी स्वयंसेवी संस्था संभाळत असेल तर त्या जनावरांचे लसीकरण पशुसंवर्धन विभाग करेल अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी म्हटलं आहे. लम्पीच्या प्रादुर्भावाचा गैरफायदा घेऊन दूध तुटवडा (Milk Shortage) असल्याची अफवा कोणी पसरवत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या सायबर क्राईम अंतर्गत कारवाई केली जाईल असे विखे पाटील यांनी सांगितले.

'माझे पशुधन माझी जबाबदारी' या धर्तीवर पशुपालकांनी काम करावं

लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या स्तरावर जो एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, तो कसा खर्च करायचा याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ हे घेतील. त्यांना तो निर्णय घेण्याचा अधिकार दिल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. लम्पीच्या प्रादुर्भावाचा गैरफायदा घेऊन दूध तुटवडा असल्याची अफवा कुणी पसरवत असेल तर अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, कोरोना काळात जसे कोरोना योद्धा होते तसेच लम्पीचा पार्श्वभूमीवर 'लम्पी योद्धा' तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे विखे पाटील म्हणाले. तसेच 'माझे पशुधन माझी जबाबदारी' या धर्तीवर पशुपालकांनी काम करणं गरजेचं आहे. सोबतच पशुसंवर्धन विभागाला मनुष्यबळ कमी पडणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. काही जागा तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार असून खासगी डॉक्टरांची मदत घेतली जात असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

जमिनींच्या खरेदी-विक्री आणि मोजणी संदर्भात महसूल विभागाने अहमदनगर जिल्ह्यात एक पायलट प्रोजेक्ट हाती घेतल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जमिनीच्या नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर एका महिन्याच्या आत नोंदणी झाली पाहिजे. यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

राधाकृष्ण विखे पाटलांचा शेर कोणासाठी

राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर येथे एका कव्वालीच्या कार्यक्रमात 'दुश्‍मनी अच्‍छी नही मुझे दोस्‍त बनाकर देख' असा शेर पेश केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. हा शेर नेमकी कोणासाठी होता याबाबत त्यांना विचारले असता ज्यांच्या डोक्यात टोपी बसेल तो शेर त्यांच्यासाठी होता असं उत्तर त्यांनी दिलं आहे. मात्र, संगमनेर येथील कार्यक्रमात त्यांनी हा शेर सादर केल्यानं हा शेर काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासाठी असावा अशी चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/ZcNKIFD Skin Disease : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारत धुळ्यात भरवला जनावरांचा बाजार, कारवाई होणार का?

<a href="https://ift.tt/mWElayB Skin Disease : राज्यातील 27 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, 3 हजार 291 जनावरे रोगमुक्त, आज 25 लाख लसमात्रा उपलब्ध होणार : पशुसंवर्धन आयुक्त

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/action-will-be-taken-if-rumors-of-milk-shortage-are-spread-says-minister-radhakrushn-vikhe-patil-1103320
0 Comments