Maharashtra Rain : पुढील ४ दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

<p><strong>Maharashtra Rain :</strong>&nbsp; उत्तर भारतातून काढता पाय घेणाऱ्या मान्सूनची राज्यातूनही निरोपाची वेळ जवळ आलेय... मात्र जाता जाता मान्सूनचं हे शेपूट तडाखा देऊन जाणार असं दिसतंय... कारण पुढील ४ दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.... सध्या मान्सूननं जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान &nbsp;पंजाब, चंदीगड, दिल्ली या भागातून माघार घेतलेय. महाराष्ट्रातून 5 ते 10 ऑक्टोबरदरम्यान मान्सून माघारी फिरणार आहे... तर मुंबईतूनही ८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस निरोप घेईल... मात्र या काळात अनेक भागात संध्याकाळच्या वेळेस पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-heavy-rain-in-the-state-for-the-next-4-days-1105375

Post a Comment

0 Comments