Pune accident : पुण्यातील हडपसर परिसरात मोठा अपघात झाला आहे. एका कॉन्क्रिट मिक्सर ट्रकनं एकाच वेळी चार रिक्षांना धडक दिली आहे. या भीषण अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. रिक्षात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कॉन्क्रिट मिक्सर ट्रक खाली अडकलेल्या रिक्षा क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आल्या आहेत.

अपघात स्थळी पोलीस आणि अग्निशामक दल दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरु आहे. माहितीनुसार सोलापूरवरून भरधाव वेगाने हा कॉन्क्रिट मिक्सर ट्रक येत होता. या परिसरातील मोठ्या झाडांना धडक दिली आणि त्यानंतर हडपसरच्या गाडीतळ परिसरातील उभ्या असलेल्या रिक्षांना कॉन्क्रिट मिक्सर ट्रक धडकला. या धडकेत रिक्षांचा चक्काचूर झाला आहे.

अपघातानंतर कॉन्क्रिट मिक्सर ट्रकचा चालक फरार झाला आहे. तर क्लिनरचा या अपघातात मृत्यू झाला आहे. गंभीर जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

(बातमी अपडेट करत आहोत...)

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pune-accident-container-accident-at-hadapsar-rickshaw-damage-many-injured-1105045
0 Comments