Agriculture News in Nandurbar : राज्यात परतीच्या पावसाचा (Rain) खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील परतीच्या पावसानं मोठं नुकसान झालं आहे. नंदूरबार जिल्ह्यात या पावसाचा सर्वात मोठा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पपईच्या बागांमध्ये पाणी साचून राहिल्यानं पपई बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.

पपई बागा उध्वस्त होण्याच्या परिस्थितीत

पपई बागांवर डवणी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं पिकावर मोठा परिणाम झाला आहे. पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळून पडत आहेत. तर फळाच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळं त्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आसल्यानं नंदूरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळं नंदूरबार जिल्ह्यातील पपई बागा उध्वस्त होण्याच्या परिस्थितीत आहेत. कृषी विभागाच्या वतीनं पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या परिसरात या रोगांच्या नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचं प्रत्यक्षिक घ्यावीत अशी अशी मागणी शेतकर्‍यांच्या वतीने करण्यात येत आहे. नंदूरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी गेल्या तीन ते चार वर्षांपासून पपईवर पडणाऱ्या विविध रोगांमुळं हैराण झाले आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या पपई संशोधक तज्ज्ञ प्राध्यापकांनी डावणी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाय योजना सुचवल्या आहेत.

रस शोशणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव

यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळं रस शोशणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे. या किडींमुळं पपईच्या पिकावर मोठा परिणाम होत आहे. यामुळं पपईची पानं पिवळी पडत असून पानगळ मोठ्या प्रमामावर होत असल्याची माहिती नंदूरबारच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक पद्माकर कुंदे यांनी दिली आहे. वाढलेली उष्णता आणि पडणारा पाऊस यामुळं आर्द्रता जास्त आहे. त्याचा पिकावर परिणाम होत असल्याची माहिती कुंदे यांनी दिली.

परतीच्या पावसाचा मोठा फटका

सुरुवातीच्या काळात जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसानं थैमान घातलं होतं. या पावसानं राज्यातील शेतकरी कोलमडला होता. या पावसातून काही शेतकऱ्यांची पिकं वाचली होती. मात्र, त्यानंतर या चालू ऑक्टोबर महिन्यात पुन्हा परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला. यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. हाती आलेली शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/7raUJdz : बळीराजानं दिवाळी साजरी करायची कशी? परतीच्या पावसाचा पीकांना दणका, शेकडो शेतकरी कुटुंब मदतीच्या अपेक्षेत

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/nandurbar-news-papaya-farmers-in-nandurbar-district-in-trouble-fungal-disease-outbreak-on-papaya-orchards-1114592
0 Comments