Buldhana Fire News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यतील खामगावमध्ये (Khamgaon) आठवडी बाजार परिसरात भीषण लागल्याची घटना घडली. ही आग इतकी भयानक होती की, काही वेळातच आगीत नऊ दुकाने जळून खाक झाली आहेत. यामुळं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. आग लागलेल्या दुकानांमध्ये किराणा दुकान, कृषीकेंद्र, हॉटेल अशा नऊ दुकानांचा समावेश आहे. तसेच दुसरीकडं मुंबईतील कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर असलेल्या गुलाब शहा इस्टेटममधील गोदमांमध्ये देखील भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

खामगाव शहरातील बाजारपेठ ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शहरातील याच आठवडी बाजार परिसरात मध्यरात्रीनंतर एका दुकानात आग लागल्याची घटना घडली. ही आग इतकी भयानक होती की इतर आठ दुकानांना देखील या आगीनं आपल्या विळख्यात घेतलं. आता यात एकूण नऊ दुकाने जाळून खाक झाली आहेत. यामध्ये किराणा, कृषीकेंद्र , हॉटेल अशा दुकानांचा समावेश आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं. मात्र आग मोठी असल्यानं अकोला आणि शेगाव येथीलही अग्निशामक दलाला बोलावण्यात आलं होतं. दरम्यान, आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून, या आगीत मात्र मोठं नुकसान झालं आहे. सध्या अग्निशामक दलाकडून कुलिंगच काम सुरु आहे. नेमकी ही आग कशामुळं लागली याचा शोध घेतला जात आहे.

कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर गोदमांमध्ये भीषण आग

दुसरीकडं मुंबईतील कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर असलेल्या गुलाब शहा इस्टेटममधील गोदमांमध्ये देखील भीषण आग लागल्याची घटना घडली. गेल्या दोन तासंपासून अग्निशमाक दलाच्या दहा ते पंधरा बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी शेकडो कपड्याची दुकाने, कम्प्युटर पार्ट, प्लास्टिक साहित्य अशी गोदामे आहेत. यामुळं ही आग वाढत जात आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या आगीमुळं मोठं नुकसान झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/WGLPJY6 Fire : जंगलातील वणव्यांमध्ये दुप्पटपेक्षा अधिकची वाढ; सर्वाधिक वणव्यांची नोंद गडचिरोलीत

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/in-khamgaon-of-buldhana-a-fire-broke-out-in-athavadi-bazar-area-nine-shops-on-fire-1114923
0 Comments