CIDCO Lottery: सिडकोचे सामान्यांना दिवाळी गिफ्ट; 7849 परवडणाऱ्या घरांच्या लॉटरीची घोषणा

CIDCO Lottery: सिडकोने सर्वसामान्यांना दिवाळीची भेट दिली आहे. सिडकोने 7849 परवडणाऱ्या घरांच्या लॉटरीची (CIDCO Housing Lottery) घोषणा केली आहे. ही घरे नवी मुंबई विमानतळाच्या परिसराजवळ आहेत. सिडकोकडून जाहीर करण्यात आलेल्या या लॉटरीचा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनादेखील होणार आहे. दिवाळीचे औचित्य साधत सिडकोच्यावतीने घरांच्या लॉटरीची घोषणा करण्यात आली. उद्यापासून या घरांच्या लॉटरीसाठी नोंदणी करता येणार आहे. सिडकोच्या या लॉटरीच्या माध्यमातून सामान्यांना नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

लॉटरी कोणत्या परिसरातील घरांसाठी?

सिडकोने लॉटरी जाहीर केलेली 7849 घरे ही नवी मुंबईतील उलवे नोडमधील खारकोपर पूर्व 2, ए 2 बी आणि पी3, बामणडोंगरी येथील आहेत. ही घरे नवी मु्ंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरूळ-उरण रेल्वे मार्गाजवळ आहे.

गृहसंकुलाची वैशिष्ट्ये काय?

सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, नव्याने उभारण्यात येत असलेली गृहसंकुलामध्ये उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा असणार आहेत. गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नवी मुंबईतील उलवे नोडमधील खारकोपर व बामणडोंगरी येथे ७८४९ घरे विक्रीसाठी उपलब्ध!#YourCIDCOHome pic.twitter.com/Z1XhUYYC94
— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) October 24, 2022

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा ही तीन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याशिवाय, दोन लाख 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदनिका उपलब्ध असणार आहे.

नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सिडको एक लाख घरे उपलब्ध करणार असून आतापर्यंत जवळपास 25 हजार घरे सिडकोने विकली आहेत. गणेशोत्सवातही सिडकोने 4 हजार 158 घरांची आणि 245 व्यापारी गाळ्यांसाठीची सोडत जाहीर केली होती. द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलातील 4158 घरांची सोडत काढण्यात आलेली. त्यातील 403 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता राखीव होती. तर उर्वरित 3754  घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/UTdIDbJ राज्यातील 75 हजार जागांची नोकर भरती नेमकी कशी असेल? कोणत्या खात्यात किती जागा?

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/cidco-announce-7849-affordable-housing-lottery-near-navi-mumbai-international-airport-1113744

Post a Comment

0 Comments