Tanaji Sawant : दिवाळी झाल्यावर यांचा मुक्काम कुठे हे फाईल ठरवतील, मंत्री तानाजी सावंतांचा ओमराजेंसह कैलास पाटलांना इशारा

Tanaji Sawant : राज्याचे आरोग्य मंत्री आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant) यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांसह (MP Omraje Nimbalkar) आमदार कैलास पाटील (Mla Kailas Patil) यांना थेट इशारा दिला आहे. सगळ्याच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. एक एक फाईल, एक एक कुंडली हळूहळू ओपन होणार आहे. फक्त दिवाळी सुखाची जाऊ दिली आहे. दिवाळी झाल्यावर यांचा मुक्काम कुठे हे यांच्या फाईल ठरवतील असा इशारा सावंत यांनी दिला आहे.

आमदार कैलास पाटील यांच्य सुरु असलेल्या उपोषणावरही सावंत यांनी टीका केली. आंदोलन, उपोषणाची नौटंकी करू नका. पीक विम्याचे राहिलेले पैसे मिळणार आहेत. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याचे तानाजी सावंत म्हणाले. हे पण मलाच पाहिजे, ते माझ्या भावाचे. कॉन्ट्रॅक्ट पण मलाच पाहिजे, प्लॉटिंग माझीच, अनधिकृत काम माझेच. इथले स्टोन क्रशर बंद पाडले व सोलापूर येथील स्टोन क्रशर मध्ये भागीदारी केली. हे काय सुरु आहे, ही कुठली पद्धत आहे काम करण्याची, त्यांना वाटते की हे कुणाला कळत नाही असेही तानाजी सावंत म्हणाले. यांची जागा कुठे ते आपण ठरवायचे कारण नाही, त्यामुळं दोन अडीच वर्षात काय केलं याचं आत्मचिंतन करा असेही सावंत म्हणाले.

पैसे नाही खायचे तर काय...तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट

मी जेव्हा त्यांचा नेता होतो, तेव्हा त्यांना मी वारंवार असे करु नका असे कार्यालयात आल्यावर हातापाया पडून सांगत होतो. कमी पडले तर मला सांगा मी आहे ना? निवडणुकीत तुमचा स्वतःचा चहाचा कप सुद्धा गेला नाही, तेव्हा तुम्ही हे कशासाठी करत आहात असेही सावंत ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांना उद्देशून म्हणाले. तेव्हा ते म्हणायचे साहेब पैसे नाही खायचे तर काय शेण खायचे का ? असा गौप्यस्फोट देखील सावंत यांनी खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील यांच्याबाबत जाहीर भाषणात केला.

शेतकऱ्यांना हक्काचा 2020 चा पीक विमा (Pik Vima) मिळावा तसेच अतिवृष्टीचे अनुदान मिळावं या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील  यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरु केलं आहे. पाटील यांनी उस्मानाबाद (osmanabad) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 6 वा दिवस आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/BWMwCkr Patil Agitation : आमदार कैलास पाटलांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी टाकल्या पाण्यात उड्या, आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/minister-tanaji-sawant-warning-to-mp-omraje-nimbalkar-and-mla-kailas-patil-1115256

Post a Comment

0 Comments