Mumbai News : मुंबईच्या चेंबूर कॅम्प परिसरामध्ये (Mumbai Chembur Camp area) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आजी आणि माजी महिला शाखा प्रमुखांमध्ये मध्यरात्री तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. चेंबूर कॅम्प परिसरामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखा 154 मध्ये हा राडा झाला आहे. शाखेच्या जागेवरुन आजी-माजी महिला शाखाप्रमुखांमध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान हा राडा झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन उद्धव ठाकरे गटाचे आजी-माजी महिला शाखा प्रमुखांसह सर्व कार्यकर्त्यांना समजून पोलिस स्टेशनला नेले आहे.

दरम्यान, आजी आणि माजी महिला शाखाप्रमुखांच्या राड्यांमध्ये काही पुरुष शिवसैनिकांवर चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून, अधिक तपास करत आहेत.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/controversy-between-thackeray-group-women-in-chembur-camp-area-1116498
0 Comments