30 December Headlines : विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस, मुंबईत 538 कोटींचं ड्रग्ज नष्ट करणार, आज दिवसभरात

30 December Headlines : अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधान परिषदेत सकाळी 10 वाजता विशेष बैठक आणि 11 वाजता अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल. याबरबरच आजच्या महत्वाच्या घडामोडींमध्ये कस्टम झोन तीनकडून आज जवळपास 538 कोटींचं 140 किलो ड्रग्ज नष्ट केलं जाणार आहे. तळोजा येथे दुपारी 12 वाजता हे ड्रग्ज नष्ट केलं जाणार आहे. शिवाय अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आईची पत्रकार परिषद होणार आहे. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत.

आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस

अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. आजवरच्या परंपरेप्रमाणे शिंदे फडणवीस सरकार विदर्भातून जाता जाता काही पॅकेज जाहीर करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा आराखडा सांगताना अनेक नव्या घोषणा केल्या आहेत. विधान परिषदेत सकाळी 10 वाजता विशेष बैठक आणि 11 वाजता अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सत्ता पक्षाची आणि विरोधकांची पत्रकार परिषद होईल.

नवी मुंबईत आज जवळपास 538 कोटींचं 140 किलो ड्रग्ज नष्ट केलं जाणार

कस्टम झोन तीनकडून आज जवळपास 538 कोटींचं 140 किलो ड्रग्ज नष्ट केलं जाणार आहे. तळोजा येथे दुपारी 12 वाजता हे ड्रग्ज नष्ट केलं जाणार आहे.

तुनिषा शर्माच्या आईची पत्रकार परिषद

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आईची पत्रकार परिषद होणार आहे. याबरोबरच आज वसई कोर्टात शिजान खान याला वालीव पोलीस हजर करणार आहेत.

रितेश देशमुख आणि जेनेलिया तुळजापुरात तुळजाभवानीचे दर्शन घेणार

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया वेड चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणार आहेत.

पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे पंतप्रधान मोदी 7800 कोटींच्या विविध योजनांचं भूमीपूजन करणार आहेत.

राणा कपूर यांच्या जामीनावर सुनावणी
येस बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी राणा कपूर यांना अटक केली होती. या प्रकरणात त्यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात जामिनासाठी धाव घेतली आहे. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

अहमदनगरमध्ये राज्यस्तरीय बालएकांकिका स्पर्धांचे उद्घाटन
अहमदनगरच्या माऊली सभागृहात कांकरिया करंडक राज्यस्तरीय बालएकांकिका स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे.  सलग 25 वर्ष राज्यात सुरू असणारी बाल एकांकिका स्पर्धा म्हणून या स्पर्धेला महत्व आहे. राज्यभरातील 25 एकांकीका या स्पर्धेत सादर होणार आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील मायरा वयकुल ही उद्घाटनासाठी असणार आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/30-december-headlines-maharashtra-winter-session-last-day-cm-dcm-press-conference-tunisha-sharma-marathi-news-1135522

Post a Comment

0 Comments