Abdul Sattar : सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Assembly Session 2022) सुरु आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काल (26 डिसेंबर) सभागृहात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांसह (Ajit Pawar) विरोधकांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपाला आज अब्दुल सत्तार हे सभागृहात उत्तर देणार आहेत. त्यामुळं पवारांच्या आरोपावर सत्तार नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

कथित गायरान जमीन घोटाळाप्रकरणी सत्तारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे. वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन खासगी व्यक्तीला हस्तांतरित केल्या प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले आहेत. हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) आणि पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणात अब्दुल सत्तार आज विधानसभेत उत्तर देणार आहेत.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

गायरानासाठी असलेली जागा कोणाला देता येत नाही. सार्वजनिक कामासाठी सरकारच्या परवानगीने ती जागा देत येते. मात्र वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन खासगी व्यक्तीला हस्तांतरित केली असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच दुसरीकडे सिल्लोड येथील कृषी महोत्सवावरुन अजित पवार यांनी सत्तार यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. कृषी महोत्सवाचा नावाने तिकीट छापून वसुली करण्यात येत असल्याचा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. तसंच अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करुन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली. त्यांच्या याच आरोपाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी असा प्रकार घडला असेल तर नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.

हे सरकार आल्यापासून कृषीमंत्री अब्दुल सत्तार बेताल वक्तव्य करत असल्याचे अजित पवार म्हणाले. महिलांबद्दल चुकीचे वक्तव्य त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं आहे. अशातच त्यांनी गायरान जमीन हस्तांतरीत करण्यासह कृषी महोत्सवा संदर्भातील प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळं अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/jUWvYw4 Sattar: गायरान जमीन अन् कृषीप्रदर्शन प्रकरण सत्तारांना भोवणार? कृषीमंत्री म्हणतात, मी सभागृहातच उत्तर देणार...

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/nagpur-winter-assembly-session-2022-minister-abdul-sattar-will-answer-the-allegations-by-the-opposition-leaders-today-1134411
0 Comments