Aurangabad Corona Update: औरंगाबादमध्ये कोरोनाचा 'पहिला रुग्ण' आढळला, आरोग्य विभाग अलर्ट

Aurangabad Corona Update: चीनमध्ये कोरोनाचा थैमान (China Covid Outbreak) पाहता राज्यसह देशभरातील आरोग्य विभाग अलर्ट (Health Department Alert) झाले आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) देखील कोरोनाच्या चाचण्या (Corona Test) वाढवण्यात येत आहे. दरम्यान वाळूज महानगरमधील बजाजनगरातील सिडकोत कोरोनाचा रुग्ण (Corona Patient) आढळून आला. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने त्याचा आरटीपीसीआर (RTPCR) स्वॅब तपासणीसाठी पाठवला आहे. तर खासगी डॉक्टरांच्या मार्गदर्शनात या रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धा परीक्षेसाठी खानदेशातून एक विद्यार्थी शहरात आला होता. दरम्यान त्याची अँटीजेन चाचणी करण्यात आली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर गंभीर लक्षण नसल्याने त्याला त्याच्या राहत्या खोलीमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.

आरोग्य केंद्रांत कोरोना चाचण्या

गेल्या काही दिवसांपासून चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होतांना पाहायला मिळत आहे. अशात औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत सुदैवाने एकही रुग्ण सक्रीय नव्हता. मात्र आता वाळूज भागात जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण आढळून आला असल्याने आरोग्य विभाग देखील अलर्ट झालं आहे. तसेच आता खबरदारीचा उपाय म्हणून मनपाच्या 41 आरोग्य केंद्रांत कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत.

source https://marathi.abplive.com/news/aurangabad/maharashtra-news-aurangabad-corona-news-the-first-patient-of-corona-was-found-in-aurangabad-health-department-alert-1133801

Post a Comment

0 Comments