<p>एकीकडे तानाजी सावंत यांनी महाराष्ट्रात कोरोनाची भीती नसल्याचं म्हटलं असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानी मास्कसक्तीचा निर्णय़ घेतलाय.. शिर्डी पाठोपाठ आता त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासन आणि पंढरपुरातील विठ्ठल मंदिर प्रशासनानं मास्कसक्तीचा निर्णय घेतलाय... <br />त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना आता मास्क वापरणे बंधनकारक केलंय... तर तिकडे पंढरपूर मंदिर समितीनं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विट्ठल मंदिरात मास्क सक्तीचा निर्णय घेतलाय.., दर्शनाला येणाऱ्या भाविकांना मास्क परिधान करून येण्याचे आवाहन करण्यात आलंय... मंदिर समितीकडून दर्शन रांगेत मास्क नसलेल्या भाविकांना डिस्पोजेबल मास्क दिला जाणार आहे</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-many-big-temple-wearing-masks-not-mandatory-due-to-corona-1133517
0 Comments