Pune Airport : पुणे विमानतळाबाहेर रस्त्याचं काम सुरु <a href="https://ift.tt/m2HW0og Airport) असल्याने इंटरनेट कनेक्टिव्हिटी (Internet conectivity) काही काळासाठी बंद झाली होती. त्यामुळे एअरलाईन्सच्या (<a href="https://ift.tt/x4Tlr9C) चेक-इन काऊंटरवर प्रवाशांच्या रांंगाच रांगा लागल्या. शुक्रवारी (23 डिसेंबर) दुपारी हा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांना फ्लाईटमध्ये चढण्यासाठी त्रास सहन करावा लागला. विमान कंपन्यांना विना इंटरनेट प्रवाशांची तपासणी करावी लागली. त्यामुळे प्रवाशांच्या तपासणीत काही वेळ उशीर झाला. रस्त्याचं काम अजूनही सुरु आहे त्यामुळे आजही असा प्रकार घडण्याची शक्यता आहे.

विमानतळाच्या बाहेर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे विमानतळाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरवणाऱ्या डेटा केबल्स तुटल्या. 5.20 वाजता कनेक्टिव्हिटी परत येण्यापूर्वी अनेक तास काऊंटर ऑफलाइन राहिले, असं भारतीय विमानतळ प्राधिकरणाने निवेदनात म्हटलं आहे. त्यासंदर्भात त्यांनी ट्वीटदेखील केलं आहे.

काय म्हटलं आहे ट्वीटमध्ये?

"विमानतळाच्या बाहेर चालू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे काही डेटा केबल्स तुटल्या. ज्यामुळे चेक-इन सिस्टम सर्व्हरमध्ये अडथळा निर्माण झाला. दुरुस्तीचे काम सुरु होतं. या अडथळ्यामुळे एअरलाईन्स मॅन्युअल चेक-इन करत आहेत आणि यामुळे चेक-इन प्रक्रियेत विलंब होऊ शकतो. आम्ही लवकर दुरुस्तीवर काम करत आहोत. गैरसोयीबद्दल खेद वाटतो," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

प्रिय प्रवाशांनो, एअरलाइन चेक-इन सिस्टमच्या सर्व्हर कनेक्टिव्हिटीमध्ये व्यत्यय आल्याने मॅन्युअल चेक-इन केले जात आहे आणि चेक-इन प्रक्रियेस विलंब होऊ शकतो. आम्ही लवकर दुरुस्तीवर काम करत आहोत. गैरसोयीबद्दल दिलगीर आहे. @AAI_Official @aairedwr

— पुणे विमानतळ /Pune Airport (@aaipunairport) December 23, 2022

प्रवाशांच्या तक्रारी

ख्रिसमस आणि नवीन वर्षामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना दोन तास आधीच विमानतळावर पोहोचण्याचं आवाहन केलं आहे. त्यात रस्त्याचं काम सुरु असल्याने तपासणीत अडथळा निर्माण झाला. त्यामुळे प्रवाशांनी लांब रांगा लागल्या. प्रवाशांनी या गैरसोयीची तक्रार केली आहे. शुक्रवारच्या तांत्रिक बिघाडामुळे गैरसोय झालेल्या प्रवाशांनी या गोंधळाची तक्रार सोशल मीडियावर केली आहे.

विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग सुरु

चीन आणि देशाच्या काही भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सगळीकडे खबरदारी घेतली जात आहे. याच सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे महापालिकादेखील सज्ज झाली आहे. खबरदारीचा भाग म्हणून पुणे विमानतळावर बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग सुरु करत आहे, असं पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. खबरदारीच्या उपायांचा भाग म्हणून पीएमसीने लोकांना कोविडच्या नियमांचं पालन करण्याचे आवाहन केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असेही ते म्हणाले. पुण्यात सध्या 44 सक्रिय कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. चाचणीसाठी आरटीपीसीआर केंद्रे पुन्हा सुरु केली जातील आणि वॉर्ड कार्यालयांच्या माध्यमातून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Go First luggage check in chaos at Pune Airport #GoFirst #puneairport pic.twitter.com/znUy7jDo8l

— TARUN NAGPAL (@TARUN_NAGPAL) December 23, 2022

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/amid-heavy-footfall-disrupted-internet-connectivity-results-in-long-queues-at-pune-airport-1133534
0 Comments