Pune News : दहावीतील विद्यार्थ्याला (Suicide) आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून थेट मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) ही धक्कादायक घटना घडली आहे. काय घडलं नेमकं? (Pune Crime Marathi News)

दहावीच्या परीक्षेत हक्काचे 20 गुण देणार नाही, मुख्यध्यापकांकडून वारंवार धमकी

आयुष गारळे असं या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. आयुष अभ्यास करत नाही, म्हणून शाळेतून काढून टाकेन, तसेच दहावीच्या परीक्षेत हक्काचे 20 गुण देणार नाही, दहावीच्या परीक्षेला ही बसू देणार नाही. अशी धमकी मुख्याध्यापक हितेश शर्मा देत होते. असा त्यांच्यावर आरोप आहे. आयुष दिघी येथील प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेतो. त्याच शाळेत दहा डिसेंबरला ही आयुषला शाळेतून घरी आणण्यासाठी त्याची आई स्वतः गेली होती. तेव्हा मुख्याध्यापक शर्मा यांनी आईला आवाज देऊन बोलावून घेतलं आणि वरील सर्व बाबी त्यांना सांगितल्या. त्यामुळे आयुषने याचा चांगलाच धसका घेतला होता.

...आणि आयुषने गळफास घेत आयुष्य संपवलं
यानंतर 13 डिसेंबर रोजी घरातील सगळे बाहेर गेले, तेव्हा आयुष घरी असल्याने आयुषने गळफास घेत आयुष्य संपवलं. त्याच्या मृत्यूला मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्याच आधारावर भोसरी पोलिसांनी मुख्याध्यापक शर्मा यांच्यावर 24 डिसेंबरला कलम 305 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप मुख्याध्यापक शर्मांना अटक केलेली नाही.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-pune-crime-marathi-news-case-filed-against-headmaster-on-charge-of-inciting-a-student-of-class-10-to-commit-suicide-1135152
0 Comments