Nashik News : नाशिकमध्ये लाचखोरी थांबेना! भूमी अभिलेखच्या अधीक्षकांना 50 हजारांची लाच घेताना अटक

Nashik Crime : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात दर आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होत असताना लाचखोरी थांबण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. लाचलुचपत विभागाचे अधिकारी कर्मचारी लाचखोरीला आळा बसावा यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. परंतु लाचखोरी थांबायचं नाव घेत नाही. त्यातच आता नाशिक शहरात लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे.

नाशिकसह जिल्ह्यातील मागील काही लाचखोरीच्या (Bribe) घटनांचा आढावा घेतला असता एका महिन्यात एक नायब तहसीलदार आणि कोतवाल, ग्रामसेवक आदी अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने (ACB) ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाचखोरीचे जाळे शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत पसरल्याचे अधोरेखित झाले आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या जिल्हा अधीक्षकाला तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. जमीन मोजणीमध्ये हद्द कायम करण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत 50 हजारांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख विभागाचा अधीक्षक महेशकुमार शिंदे आणि लिपिक अमोल भीमराव शिंदेला महाजन यांना अटक करण्यात आली. मंगळवारी (31 जानेवारी) पथकाने रंगेहाथ अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती आणि तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जिल्ह्यातील एका गावातील जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज होता. मोजणी झाल्यानंतर पोटखराबा कमी जास्त करण्यासाठी महाजन याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले. तक्रारदाराला अधीक्षक शिंदेला भेटण्यास पाठवले असता शिंदेने एक लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यानंतर अधीक्षक तक्रारदाराकडून 50 हजारांची लाच घेताना पथकाने रंगेहाथ अटक केली. शिंदेकडे नाशिक विभागातील तीन जिल्ह्यांचा अतिरिक्त कारभार असल्याचे सांगण्यात आले. पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

एसीबीकडून आवाहन....

दरम्यान या सापळ्यामध्ये एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, पोलीस नाईक शरद हेंबाडे, चालक संतोष गांगुर्डे यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना केले आहे.

source https://marathi.abplive.com/news/nashik/maharashtra-news-nashik-news-superintendent-of-land-records-arrested-while-accepting-bribe-of-50-thousand-1147298

Post a Comment

0 Comments