Pune Bypoll Election : भारतीय जनता पक्षानं (BJP) पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे (Kasba Constituency) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज (25 फेब्रुवारी) कसबा गणपतीसमोर उपोषण करणार आहेत. कसबा पेठेतील रविवार पेठ, गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू केले आहे. या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी असल्याचा आरोप धंगेकर यांनी केलाय.

सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात होणार

भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप रविंद्र धंगेकर यांनी केलाय. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपतीसमोर उपोषण करणार आहेत. सकाळी 10 वाजता त्यांचे उपोषण आणि धरणे आंदोलनला सुरुवात होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे इतर कार्यकर्ते सुद्धा उपस्थित राहणार आहे.

source https://marathi.abplive.com/news/pune/pune-bypoll-election-congress-candidate-for-kasba-constituency-ravindra-dhangekar-will-go-on-fast-today-1154682
0 Comments