Electricity Price Hike : मुंबईसह राज्यातील वीज <a href="https://ift.tt/4amFqwo href="https://ift.tt/KyPiDEh> दरवाढीचा बॉम्ब लवकरच फुटणार आहे. वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीज दर निश्चितीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर जनसुनावणी पार पडली आहे. त्यामुळे नवे वीजदर लवकरच लागू करावे लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वीज आयोगाचे वीज दराचे आदेश तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्याबाबत लवकरच आदेश जारी केला जाणार आहे. मात्र आता याच प्रस्तावित वीज दरवाढीला महावितरणच्या माजी अभियंत्यानेच औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. तर प्रस्तावित वीज दरवाढ रोखण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.
महावितरणचे माजी अभियंता अजित देशपांडे यांनी अॅड. गिरीश नाईक- थिगळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर 10 एप्रिल रोजी प्राथमिक सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे यात ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, एमएसईबीच्या होल्डिंग कंपनीचे अध्यक्ष (ऊर्जामंत्री), वीज नियामक आयोगाचे सचिव, महावितरणचे संचालक (वाणिज्यिक) व महावितरणच्या अध्यक्षांसह व्यवस्थापकीय संचालक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. 
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-chhatrapati-sambhaji-nagar-proposed-electricity-tariff-hike-challenged-in-court-petition-filed-in-chhatrapati-sambhaji-nagar-bench-1164084
0 Comments