<p> आंबा हा फळांचा राजा आणि त्यामध्ये कोकणातील हापुस हा आपल्या वेगळ्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध असून त्याला जगभरातुन मागणी आहे. नैसर्गिक संकटं आणि असंख्य आव्हानं पेलत हापुस आंबा आता सातासमुद्रापार पोहचलाय... कोकणातील प्रमुख शहारांमध्ये हापूसला योग्य दर मिळाला नसला तरी आखाती देशात हापूस आंब्याला चांगला दर मिळतोय.. फळ बाजारात हापूसची आवक वाढत असून परदेशातून देखील हापूसची मागणी वाढत आहे त्यामुळे याचा फायदा नक्कीच कोकणातील आंबा बागायतदारांना होईल </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-good-prices-for-konkan-hapus-mangoes-in-gulf-countries-1163555
0 Comments