APMC Election 2023 Result : सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Agricultural Produce Market Committee) रणधुमाळी सुरु आहे. काही ठिकाणी मतदान प्रक्रिया होऊन निकालही जाहीर झाले आहेत. तर काही ठिकाणचे निकाल अद्याप बाकी आहेत. आजही काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला अवघ्या 31 बाजार समित्यांमध्ये विजय मिळवला आहे.

दरम्यान, या बाजार समित्यांच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळतोय. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला आहे. तर बऱ्याच ठिकाणी सत्ताधारी गटालाही धक्का बसल्याचे चित्र आहे.
राहिलेल्या ठिकाणी मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय हे आज स्पष्ट होणार आहे.

बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे, नाशिक जिल्ह्यात मंत्री दादा भूसे, मंत्री विजयकुमार गावीत, एकनाथ खडसे या सारख्या नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसला आहे. या नेत्यांच्या पॅनेलचा पराभ झाला आहे. काही ठिकाणी सत्तेसाठी निर्माण झालेल्या अभद्र युत्यांना सुद्धा मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यातील निकालामध्ये संमिश्र यश उमटलं आहे. विदर्भातील रामटेक, नागपूरमधील सुनिल केदार, आशिष जायस्वाल यांच्या अभद्र युतीला त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या पॅनलने केलेला पराभव चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांना मोठा धक्का बसला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या युतीने बाजी मारली. नगरमध्ये विखे पाटील गटाला बाळासाहेब थोरातांनी धक्का देत भोपळाही फोडू दिला नाही.

कुठे काय झालं?

मालेगाव : पालकमंत्री दादा भुसे यांच्या ' आपलं पॅनल ' ला धक्का देत शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्या कर्मवीर भाऊसाहेब पॅनल विजयी.
भंडारा : नाना पटोलेंच्या जिल्ह्यात काँग्रेसला जेमतेम यश
नंदुरबार : मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या भावाचा पराभव..
बारामती : सर्वच्या सर्व 12 जागांवर राष्ट्रवादीचा कब्जा करताना सत्ता राखली आहे.
दौंड : संजय राऊतांच्या आरोपांनंतरही दौड बाजारसमितीत आमदार राहुल कुल यांचा दणदणीत विजय झाला आहे.
भुसावळ जळगाव : बाजार समितीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भुसावळमध्ये धक्का बसला आहे. भुसावळमध्ये 18 पैकी 15 जागांवर भाजप सेनेचा विजय झाला आहे.
दिग्रस, यवतमाळ : अन्न व औषधी प्रशासनमंत्री संजय राठोड यांना धक्का बसला आहे, तर नेरमधे माजी मंत्री माणिकराव ठाकरेंना धक्का बसला.
इस्लामपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 17 जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला.
नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पॅनलचा धुवा, 18 पैकी 17 जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपले वर्चस्व ठेवले कायम बाजार समिती निवडणुकीत आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित पॅनलला खातेही उघडता आले नाही.
नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेच्या भगवा फडकला. 18 पैकी 17 जागांवर एक हाती शिवसेनेचे सत्ता तर एका जागेवर अपक्ष उमेदवार यांचे वर्णी लागली. भाजप नेते डॉ. विजयकुमार गावित यांच्या भावाचा पराभव.
मालेगाव : मंत्री भुसेंना धक्का, बाजार समिती अद्वय हिरेंकडे, 11 पैकी 10 जागांवर ' कर्मवीर भाऊसाहेब हिरे ' पॅनल विजयी.
संगमनेर : बाजार समितीवर बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व सिद्ध, 18 पैकी 18 जागा जिंकून महाविकास आघाडीचा विजय. भाजपचे विखे पाटील गटाचे खातेही उघडले नाही. सर्व 18 जागा थोरात गटाने मिळवला विजय.
परळी : धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांना धोबीपछाड. कृषी उत्पन्न बाजार समिती 18 पैकी 11 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय. सेवा सहकारी सोसायटी विभागातील 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस नि जिंकल्या भाजपाला अद्याप एकही जागा जिंकता आली नाही.
अमरावती : बाजार समितीत आमदार यशोमती ठाकूर यांनी झेंडा फडकवला, आमदार रवी राणा यांना मोठा धक्का रवी राणा यांचे मोठे बंधू सुनिल राणा यांचा ही बाजार समिती निवडणुकीत पराभव. रवी राणा यांच्या पॅनलमधून एकही उमेदवार विजयी झाला नाही.
जळगाव : जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या भाजपचे शेतकरी सहकारी पॅनलचा सर्व 18 जागांवर एकहाती विजय.
नांदेड : भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस आघाडीची सत्ता कायम. 18 पैकी 15 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी विजयी. काँग्रेस 13 तर 2 जागांवर राष्ट्रवादी विजयी. अशोक चव्हाण यांचा गड शाबूत. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांना धक्का बसला आहे. भाजप-शिंदे गटाला धक्का. भाजपाला केवळ ३ जागा, तर पहिल्यांदा निवडणुक लढवबाऱ्या बीआरएसला भोपळा हाती आला आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 18 पैकी 15 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली आहे. तर भाजपनं 3 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मात्र या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

लातूर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी, बाजार समितीच्या निमित्ताने भाजपचे संभाजी निलंगेकर आणि अभिमन्यू पवार पुन्हा आमने-सामने

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/apmc-election-2023-results-of-agricultural-produce-market-committee-will-be-announced-today-1171865
0 Comments