Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आज आणि उद्या फडणवीस कर्नाटक निवडणूक प्रचारात फडणवीस सहभागी होणार

रत्नागिरी – कोकणातल्या बारसू सोलगाव रिफायनरीचा सर्वे आजपासून प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 2 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पाच पोलीस उपाधीक्षक, 1800 पोलीस अंमलदार असा पाऊस फाटा जिल्ह्यात तैनात झाले आहेत. आजचा आंदोलकांचा एकंदरीत पवित्रा पाहता आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे.

मुंबई - मुंबई लोकल ट्रेनच्या रुळांवर कचरा टाकल्याने अनेक वेळा अपघात घडले आहेत, मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये जे तांत्रिक बिघाड झाले ते देखील याच कचऱ्यामुळे झाल्याचे पुढे आले आहे... हा कचरा रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत किंवा ट्रॅक मध्ये अडकल्याने तांत्रिक विभाग होतो आणि रेल्वे सेवेला फटका बसतो. याच कारणास्तव आता मुंबई उपनगरीय रेल्वे संघटनेने या विरोधात पाऊल उचलले असून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रेल्वे रुळांवर कचरा टाकणाऱ्या लोकांवर प्रतिबंध आणावा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यांनी केली आहे....

राज्यात पुढील चार दिवस पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे... विदर्भात विजांच्या गडगडाटासह जोरदार गारपिटीची शक्यता... 25 एप्रिल रोजी काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे... आज नागपूर व गोंदिया जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट असेल असा इशारा नागपूर वेध शाळेने दिला आहे... सोबतच पुढील चार दिवस मेघगर्जनांसह अवकाळी पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी वर्तवण्यात आलाय. मराठवाड्यात 26 आणि 27 एप्रिल रोजी काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आलाय... त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि फळ बागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे..

कोल्हापूर – छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कुणाचा कंडका पडणार याचा फैसला आज होणार आहे.. चुरशीने 91 टक्के मतदान झाल्यानंतर आज रमणमळा याठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे... महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील गट यांच्या समर्थकांना पोलिसांनी थांबण्यासाठी वेगवेगळ्या जागा निश्चित करून दिल्या आहेत... त्यामुळे दोन्ही गट एकत्र येणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतलीय... माजी मंत्री सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नाशिक - स्मार्ट सिटी अंतर्गत साकारतोय गोदापार्क... साडेतीन किलोमीटर पैकी दीड किलोमीटरचे काम जवळपास पूर्ण... ग्रीन झोन स्पिरीच्युअल, ओपन असे वेगवेगळे झोन करण्यात आले आहेत, यांपैकी धार्मिक नागरी अशी ओळख असणाऱ्या नाशिकमध्ये स्पिरीच्युअल झोन 85 टक्के या आधीही गोदावरीच्या काठावर राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून गोदा पार्क साकारण्यात आला होता, मात्र गोदावरीच्या पुरात उध्वस्त झाल्यानं नवा गोदापार्क टिकणार का हा प्रश्न आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-live-updates-25th-april-2023-today-maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-marathi-headlines-political-news-mumbai-news-national-politics-news-maharashtra-live-updates-1170481
0 Comments