26th June In History: देशाच्या समाजसुधारणेच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सामाजिक क्रांतीचे प्रणेते अशी ओळख असलेले राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

1498: दात घासण्याच्या ब्रशचं पेटंट चीनच्या राजाकडे

चीनमध्ये जवळपास 1600 वर्षांपूर्वी लोक सुगंधित झाडाच्या सालीचा उपयोग दात घासण्यासाठी करत होते असा उल्लेख आहे. 1223 सालच्या एका साहित्यात असा उल्लेख आहे की बौद्ध भिख्खू हे दांतांना साफ करण्यासाठी घोड्याच्या शेपटाच्या केसांचा उपयोग करायचे. आजच्याच दिवशी म्हणजे 26 जून 1498 रोजी चीनच्या राजाने टूथब्रशचे पेटंट आपल्या नावावर केलं होतं. तोच आधुनिक काळातील पहिला ब्रश असल्याचं मानलं जातं.

1539: हुमायूं आणि शेरशाह यांच्यामध्ये ऐतिहासिक युद्ध झाले.

1874: सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म

समाजातल्या रंजल्या-गांजल्यांचे कैवारी, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील आणि राधाबाई या त्यांच्या जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. 1884 साली त्यांना करवीरच्या गादीवर दत्तक घेण्यात आलं.

शाहू महाराज हे क्रांतिकारक राजे होते. त्यांनी आपल्या हातात असलेली सत्ता ही सर्वसामांन्यासाठी वापरली आणि समाजातील पिचलेल्या समाजाला न्याय दिला. करवीर संस्थानात त्यांनी मागासवर्गीय समाजासाठी 50 टक्के आरक्षण देत असल्याचं जाहीर केलं. म्हणून त्यांना आरक्षणाचं जनक म्हटलं जातं. तसेच त्यांनी अनेक समाजपयोगी निर्णय घेतले ज्याचा परिणाम देशाच्या सार्वजनिक समाजावर झाल्याचं दिसून येतंय. शाहू महाराजांचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून ओळखला जातो.

1945: सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 50 देशांनी संयुक्त राष्ट्र घोषणा पत्रावर स्वाक्षरी केली.

1943 : साली नोबल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ, चिकित्सक आणि रोगप्रतिकारक तज्ञ तसचं, रक्त गटांचे वर्गीकरण करण्याची आधुनिक प्रणाली विकसित करणारे महान संशोधक कार्ल लैंडस्टीनर (Karl Landsteiner) यांचे निधन.

1949: बेल्जियमच्या संसदीय निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

1974 : नागपूर जवळील कोरडी येथील सर्वात मोठ्या वीजनिर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती करण्यास प्रारंभ करण्यात आला.

1982: एअर इंडिया का प्रथम बोइंग विमान 'गौरीशंकर'चा मुंबईमध्ये अपघात.

1999 : पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांच्या हस्ते शिवाजीराजांची मुद्रा असलेले दोन रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.

1999 : साली नांदेड जिल्ह्यातील किनवट या तालुक्याचे विभाजन करून माहूर हा नवीन तालुका निर्माण करण्यात आला.

2001 : प्रसिद्ध मराठी भाषिक लेखक आणि कथाकार वसंत पुरुषोत्तम उर्फ व. पु. काळे यांचे निधन.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/tooth-brush-patent-to-king-of-china-birth-of-shahu-maharaj-pioneer-of-social-revolution-today-in-history-1187254
0 Comments