Aashadhi Wari 2023 : मखयमतरयचय हसत सपतनक वठरयच शसकय महपज सपनन अहमदनगरच कळ दमपतय ठरल मनच वरकर

<p><strong>Aashadhi Wari 2023:</strong> आज (29 जून) आषाढी एकादशी (Aashadhi Wari 2023) आहे. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. या आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला.</p> <p>मोठ्या उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची &nbsp;शासकीय महापुजा केली. यावेळी त्यांनी बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे .. सुजलाम सुफलाम होऊ दे .. पाऊस पडू दे .. प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे मागणं विठुरायाच्या चरणी केलं.</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/aashadhi-wari-2023-chief-minister-eknath-shinde-with-wife-mahapooja-pandharpur-temple-vitthal-mandir-vithal-rukmini-solapur-wari-1188130

Post a Comment

0 Comments