18th July Headline :  राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. तर दिल्लीत भाजपकडून मित्रपक्षांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बेंगळूरमधील विरोधकांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. आजपासून श्रावणमासाची सुरुवात होणार आहे.

भाजपच्या मित्रपक्षांची बैठक

आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची मोर्चेबांधणी सगळ्या पक्षांनी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून दिल्लीत एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला भाजपचे काही जुने मित्र पक्ष सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

विरोधकांच्या दुसऱ्या बैठकीचा आज दुसरा दिवस

बंगळुरूमधील ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. सभागृहाचं कामकाज सुरू होण्याच्या आधीच विधान भवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी नावही जाहीर केलं जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण

दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, पोर्ट ब्लेअरच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) करणार आहेत. पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या विकास कामांचे लोकार्पण करणार आहेत.

आझाद मैदानावर बारसू रिफायनरी विरोधात आंदोलन

बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना आणि बारसू रिफायनरी विरोधी राज्यव्यापी लढा समिती आज आझाद मैदानावर बारसू विरोधात आंदोलन करणार आहे.

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 17 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सर्वेच्च न्यायालयातील महत्त्वाच्या सुनावण्या

कोळसा घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांना शिक्षेची सुनावणी होणार आहे.

पक्ष खासदार नवनीत राणा याचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या दिलेल्या आदेशा विरोधात सुप्रिम कोर्टात सुनावणी

अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा ड्रग्ज प्रकरणातील जामिन रद्द करण्याच्या मागणीसाठी नारकोटिक्स कंट्रेल ब्युरो कडून दाखल याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी

बृजभूषण सिंह यांच्या आरोपांवर सुनावणी

सहा पहिलवान महिलांच्या लैंगिक छळ केल्या प्रकरणातील आरोपी ब्रिजभूषण सिंग यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/18th-july-headline-opposition-party-meeting-second-day-bjp-meeting-in-delhi-monsoon-session-detail-marathi-news-1193370
0 Comments