CM Eknath Shinde यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका, कॅबिनेट विस्तार कधी? ABP Majha

CM Eknath Shinde यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका, कॅबिनेट विस्तार कधी? ABP Majha

Maharashtra Politicis : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री उशीरा बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडली. तब्बल दोन तास ही बैठक चालली. मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटप या संदर्भात ही बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.  दरम्यान, काल देखील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली होती.

आज मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात बैठका होत आहेत. मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटपासंदर्भात या बैठका होत असल्याची माहिती मिळत आहे. रात्री देखील वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. खाते वाटपासंदर्भात अंतिम चर्चेकरीता दोन्ही नेते दाखल झाले होते, अशीही माहिती मिळाली आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. त्यामुळं भाजपच्या अनेक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले असून, कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-cm-eknath-shinde-meetings-with-dcm-devendra-fadnavis-and-dcm-ajit-pawar-abp-majha-1191716

Post a Comment

0 Comments