CM Eknath Shinde : ठाकरे आणि पवार कुटुंबिय विरहित हे सरकार असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केलं. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपले 50 पैकी 50 उमेदवार जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मागच्या वेळी देखील अजित पवार आणि त्यांची टीम भाजपच्या (BJP) मागे लागली होती. पण त्यावेळी त्यांना प्राधान्य न देता आपल्याला प्राधान्य दिलं. आपली युती विचारांची होती, मात्र, आता जे झालंय ते पॅालिटिकल Adjustment असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हा निर्णय तुमच्या मला विश्वासात घेऊन घेतल्याचेही ते म्हणाले.

2024 ला 50 च्या 50 आमदार निवडणून येतील

माझ्या मनात प्रश्न होते ते मी थेट विचारले. तुमच्याही मनात काही प्रश्न असणं स्वाभाविक आहे. आपली युती ही विचारांची होती आता जे झालंय ते पॅालिटिकल ॲडजस्टमेन्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शरद पवार आणि ठाकरे विरहित ही युती आहे, कुटुंब विरहित आहे. येत्या 2024 ला 50 च्या 50 आमदार निवडणून येतील हे मी जाहिरपणे सांगतो असे मुख्यमंत्री म्हणाले. अडीच वर्षात झालेली कामं आणि आता एका वर्षात झालेली काम यात फरक आहे ना ? तुम्ही समाधानी आहात ना? असेही शिंदे म्हणाले.

जे घडलं त्याची चिंता करु नका

आपल्या पक्षाबद्दल लोकप्रियता वाढत जात आहे. आता जे काही घडलं त्याची चिंता तुम्ही करु नका. आपल्या जागा कशा वाढतील यावर काम करुया असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही पाच आमदारांवर देण्यात येणार आहे. आमदारांची कामं झाली नाही तर त्यांनी मला येऊन भेटावं असेही मुख्यमंत्री म्हणाले. मी राजीनामा देणार राजीनामा देणार ही चर्चा सुरु आहे ती निरर्थक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. माध्यमांसमोर जास्त लोकांना बोलू नका असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिला.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/cm-eknath-shinde-comment-on-maharashtra-politicis-shivsena-ncp-ajit-pawar-1190162
0 Comments