Maharashtra Rain Update: मुंबईजवळच्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या तीन जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून या पाचही जिल्ह्यातील शाळांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच या जिल्ह्यामधल्या नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, त्यांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुंबईत आज शाळा सुरू राहणार असून पावसाची परिस्थिती पाहून इतर निर्णय घेतली जातील असं प्रशासनाने सांगितलं आहे.

हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील 48 तासातही अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पालघर जिल्ह्यासाठी आज हवामान खात्याकडून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजही शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली असून पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दुर्घटनाग्रस्त इर्शाळगड परिसरापासून जवळच असलेल्या माथेरानमध्ये गेल्या दोन दिवसांत अतिवृष्टी झाल्याचं दिसून आलं आहे. मुंबईनजिकचं थंड हवेचं गिरीस्थान अशी माथेरानची ओळख आहे. गेल्या 24 तासांत माथेरान परिसरात तब्बल 398 मिलीमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारीही माथेरान परिसरात 342.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळं गेल्या 48 तासांत मिळून माथेरान परिसरात 740 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पुण्यातील दुर्गम भागातील 355 शाळा बंद

पुण्यातील दुर्गम भागातील शाळा आजही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, पुरंदर, मुळशी, मावळ या तालुक्यातील दुर्गम क्षेत्रातील 355 शाळा आज बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.

जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या भागातील अंगणवाड्याही आज बंद ठेवल्या जाणार आहेत. ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि सीडीपीओ यांनी परिसरात उपस्थित असणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहतील. हा आदेश अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, सर्व मंडळांशी संलग्न अनुदानित आणि खाजगी शाळांना लागू आहे. इतर सर्व भागातील शाळा आणि अंगणवाड्या सामान्यपणे चालू राहतील.

ही बातमी वाचा:

<a href="https://ift.tt/dYfjQzt Shinde: कोणतीही आपत्ती असो, एकनाथ शिंदे यांच्यातील 'शिवसैनिक' पोहोचतो थेट स्पॉटवर; 'या' घटना आहेत साक्षीदार

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-update-school-closed-today-palghar-thane-raigad-ratnagiri-sindhudurg-marahi-news-1194296
0 Comments