<p>राज्यातल्या काही भागात धरणं भरायला सुरुवात झाली असली तरी राज्यातल्या काही भागात अजुन धरणं म्हणावी तशी भरली नाहीयेत. नगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरणाच्या पाणीपातळीत आज वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १२ जुलै रोजी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. पण नंतर पावसानं दडी मारल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास उशीर झाला. त्यामुळे जर पाणीसाठ्यात वाढ झाली नाही तर पुणे,नगर आणि सोलापूर जिल्ह्यांना पाण्याची समस्या भेडसावू शकते. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ujjani-dam-water-level-is-increasing-day-by-day-as-rain-has-started-late-dam-is-filling-up-late-marathi-news-1197052
0 Comments