<p>राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस सध्या सुट्टीवर गेला आहे. मात्र येत्या तीन दिवसांत चांगला पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. सोमवार आणि मंगळवारी कोकण, मुंबईसह घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस पडले, तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते हलका पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून सुरू होऊन <br />९० दिवस होत आले तरी मुंबई-कोकण वगळता अजूनही राज्यातील बहुतांश भागांत पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे पिकं संकटात आली आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावण्याची देखील भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारने बहुतांश धरणातील साठे हे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवले आहेत. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-rain-update-heavy-rain-forecast-everywhere-in-konkan-1204738
0 Comments