Nagpur News : नागपूरच्या (Nagpur) इतवारी परिसरात दोन लुटारुंनी धमकावून 1 कोटी 15 लाखांची लूट केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना नागपूरमधील बारदाना गल्लीत संध्याकाळी आठ वाजून 35 मिनिटांच्या सुमारास घडली. दोन लूटारुंनी एका मोठ्या व्यापाराच्या कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून 1 कोटी 15 लाख रुपयांची रोकड लुटून नेली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस लुटारुंचा शोध घेत आहेत.

नेमका कसा घडला थरार

पटेल नावाच्या व्यापाऱ्याचे दोन कर्मचारी मंगळवारी संध्याकाळी आठ वाजून 35 मिनिटांच्या सुमारास अॅक्टिवा दुचाकीवर बाजारातून 1 कोटी 15 लाख रुपयांची रक्कम वसूल करुन व्यापाऱ्याच्या भुतडा चेंबर्स येथील कार्यालयाकडे जात होते. यावेळी बारदाना गल्लीमध्ये आधीच उभ्या असलेल्या दोन लूटारुंनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून थांबविले. लुटारूंच्या हातात शस्त्र पाहून व्यापाऱ्याचे दोन्ही कर्मचारी अॅक्टिवा तशीच सोडून पळून गेले. त्यानंतर दोन्ही लुटारु 1 कोटी 15 लाख रुपयांच्या रोकडसह कर्मचाऱ्यांची अॅक्टिवा घेऊन फरार झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलिस या लुटारुंचा शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/o1SI3LK Crime: सांगलीनंतर कोल्हापुरात भरदिवसा सशस्त्र दरोडा, गोळीबार करत ज्वेलर्समधून सुमारे पावणेदोन कोटींची लूट

source https://marathi.abplive.com/news/nagpur/nagpur-latest-news-1-crore-15-lakh-cash-robbed-by-robbers-in-nagpur-1197620
0 Comments