<p>ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही ऑ़डिओ क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या. त्याचा तपशील आता समोर आला आहे. एडेलवाईस कंपनीचे अध्यक्ष रशेष शाह आणि अन्य तीन जणांवर देसाईंनी गंभीर आरोप केले आहेत. रशेष शाहनं माझा स्टुडिओ गिळण्याचं काम केलं, स्मित शहा, केयुर मेहता, आर.के.बन्सल यांनी माझा स्टुडिओ लुटला, असं देसाईंनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. या सगळ्याचा तपास खालापूर पोलीस सध्या करत आहेत. </p>
source https://marathi.abplive.com/videos/entertainment/nitin-desai-audio-recording-rashesh-shah-edelweiss-group-nitin-desai-n-d-studio-1198493
0 Comments