Pune Crime News : आई-वडिल गावी गेले, ध्रुव फिरण्यासाठी रात्री एक वाजता बाहेर पडला अन् परतलाच नाही, नेमकं काय घडलं?

पुणे : पुण्यातून एक दुर्दैवी घटना (<a href="https://ift.tt/wXa8dmL Crime News) समोर आली (Pune Crime News) आहे. खंबाटकी बोगद्यानंतरच्या वळणावरील नाल्यात बावधन (पुणे) येथील युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. छिन्नविछिन्न अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. ध्रुव स्वप्नील सोनावणे 18 वर्षीय मुलाचं नाव आहे. रविवारपासून कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. मात्र त्याचा आता मृतदेह सापडला आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं असावं, याचा अंदाज लावला जात आहे.

खंबाटकी बोगद्यानंतरच्या पहिल्याच वळणावर ध्रुव सोनावणे हा टू व्हिलर घेऊन नाल्यात पडला होता. मात्र याच परिसरात मोठी झाडी आहे आणि गवतही आहे. त्यामुळे तो पडला आहे हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. मात्र रस्त्याजवळची झुडपे काढताना त्याची गाडी दिसली. या गाडीचा शोध घेतला असता. ध्रुवचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी अपघात (Road Accident) होऊन ध्रुव याचा मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांना विचारलं असता. ध्रुवचे आई-वडिल  आणि त्याची आजी हे सणसुदीसाठी अमळनेर (जळगाव) हे मूळ गावी गेले होते. ध्रुव त्याच्या बावधनच्या घरी एकटाच होता. घरी एकटाच असल्याने त्यांच्या आत्याने विचारपूस केली होती. त्यावेळी त्यांच्या आत्याला तो घरी नसल्याचं समजलं. त्यानंतर आत्याने सीसीटीव्ही चेक केलं असता. तो रात्री एकच्या दरम्यान घरातून बाहेर गेल्याचं दिसून आलं. त्यानंतर ध्रुव बेपत्ता झाल्याची तक्रार हिंजवडी पोलिसांकडे दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरु होती. मोबाईलचं लोकेशन पाहण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न केला. रविवारी दिवसभर पारगाव खंडाळा होतं. त्यानंतर त्याचं वाई परिसरात दिसत होतं. मात्र रविवारपासून त्याचं लोकेशन पोलिसांना सापडत नव्हतं. धृव आणि त्याच्या कुटुंबियांनी पाच दिवस त्याचा कसून शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. शेवट खंडाळ्याजवळ तो आणि त्याची टू व्हिलर सापडली. त्याच्या अचानक जाण्याने सोनावणे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

सोशल मीडियावरुन शोध सुरु...

ध्रुवचा शोध घेण्याचा त्याच्या कुटुंबियाांनी सोशल मीडियाचादेखील वापर केला. अनेक गृपवर मेसेज फॉरवर्ड करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावरील गृपवरील अनेकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवट त्याचा मृतदेह सापडल्याचं समोर आलं आणि सोनावणे कुटुंबियांचा आनंद हरपला.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/FpvdCVl Vijay Raman : पान सिंह तोमर आणि संसदेवरील हल्ल्याच्या मास्टमाईंडचा एन्काउंटर करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे निधन

source https://marathi.abplive.com/news/pune/road-accident-dead-body-of-youth-from-bavdhan-pune-was-found-near-khambatki-tunnel-khandala-police-1211871

Post a Comment

0 Comments