25 October In History : भारतात स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात, स्पॅनिश चित्रकार यांचा पाब्लो पिकासो जन्म; आज इतिहासात

मुंबई : आजचा दिवस हा इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण आजच्याच दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. भारतात स्वातंत्र्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीची सुरुवात  25 ऑक्टोबर 1951 रोजी सुरुवात झाली होती. तर आजच्याच दिवशी स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म झाला होता. 25 ऑक्टोबर 1980 शायर आणि गीतकार अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांचे निधन झाले. तसेच आजच्याच दिवशी  विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचे निधन झाले होते. संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचा जन्म झाला होता.

1881: प्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म

पाब्लो पिकासो (1881-1973) हे स्पॅनिश चित्रकार होते. ते विसाव्या शतकातील सर्वात चर्चित, वादग्रस्त आणि समृद्ध कलाकारांपैकी एक होते. पिकासो यांची चित्रे मानवी दु:खाचे जिवंत दस्तावेज आहेत, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते.पिकासो हे चित्रकलेतील त्याच्या अभिनव शैलीसाठी आणि अनन्यसाधारण विचारांसाठी प्रसिद्ध आहे. मॉडर्निझम, सुररिअलीझम ह्यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मिलाफ पिकासो यांच्या चित्रांमधून दिसून येतो. क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पिकासो यांच्याकडे जाते.पिकासो यांचा जन्म स्पेनमधल्या आंदालुसिया प्रांतातील मालागा ह्या शहरात झाला. कलेचा वारसा पिकासोला त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला. चित्रकलेत जात्याच हुशार असणा़ऱ्या पिकासो यांनी लहानपणी चित्रकलेत अनेक बक्षिसे मिळवली होती.

1937: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांची जयंती

डॉ. अशोक दामोदर रानडे हे भारतीय शास्त्रीय संगीत विशारद, समीक्षक आणि लेखक होते. भारतीय कला आणि संस्कृतीचे अभ्यासक, भाष्यकार, प्रयोगशील संगीतकार, गायक, साहित्यिक आणि अध्यापक अशा विविध नात्यांनी त्यांनी 50 हून अधिक वर्षे संगीत क्षेत्रात काम केले आहे.

1951 : भारतात सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात

: भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीला 25 ऑक्टोबर 1951 रोजी सुरुवात झाली होती. 25 ऑक्टोबर रोजी देशातील लोकसभेच्या 489 आणि विधानसभेच्या 3283 जागांसाठी मतदान झाले होते. त्यावेळी भारतात 17 कोटी 32 लाख 12 हजार 343 मतदार होते. त्यापैकी 10 कोटी 59 लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

1980 :  अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांचे निधन

साहिर लुधियानवी तथा अब्दुल हयी हे एक प्रसिद्ध कवी आणि हिंदी चित्रपट गीतकार होते.साहिर यांचा जन्म 8 मार्च 1921 रोजी लुधियाना येथे झाला आणि 25 ऑक्टोबर 1980 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. संगीतकार एस.डी. बर्मन यांच्यासोबत साहिर यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरू झाली. पहिल्याच भेटीत सचिनदांना साहिर यांनी काही ओळी लिहून दिल्या. 1951 मध्ये आलेल्या 'नौजवान' चित्रपटात या गीताचा समावेश झाला आणि हे गीत प्रचंड लोकप्रिय ठरले. साहिर यांनी या प्रेमगीतात संपूर्ण निसर्ग उभा केला होता. या गीताने चित्रपटसृष्टीला साहिर यांच्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली.

त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. हे गीत होते - 'ठंडी हवाएँ लहराके आयें, ऋतु है जवाँ, तुम हो यहाँ, कैसे भुलायें...' प्रख्यात अभिनेते व दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या 'बाजी' या प्रथमच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले 'तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले...' या गीताने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. अभिनेते देवानंद यांच्या म्हणण्यानुसार हे एक गाणे ऐकण्यासाठी त्यावेळी लोक जोधपूरच्या हवाई दलाच्या केंद्रावर तुफान गर्दी करायचे.साहिर यांनी लिहायला सुरुवात केली तेव्हा इक्बाल, फैज, फिराक या सारख्या कवींचे वर्चस्व होते. मात्र आपल्या लिखाणाच्या वेगळ्या शैलीमुळे साहिर हे प्रसिद्ध झाले.

2012: विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचे निधन

80 च्या दशकातील टीव्ही प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत असे नाव म्हणजे जसपाल भट्टी.  3 मार्च 1955 रोजी अमृतसरमध्ये जन्मलेले जसपाल हे असे कलाकार होते जे गंभीर विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडून लोकांना खूप हसवत होते. ते दूरदर्शनच्या 'फ्लॉप शो' आणि 'उलटा पुल्टा' शोसाठी ओळखले जातात.

आजच्या दिवशी घडलेल्या इतर महत्वाच्या घटना :

1711 : इटलीतील दोन प्राचीन ऐतिहासिक शहरे पॉम्पेई आणि हर्क्युलेनियमचे अवशेष एका गावकऱ्याने शोधून काढले.
1870 : अमेरिकेत पहिल्यांदा पोस्टकार्डचा वापर करण्यात आला.
1924 : इंग्रजांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अटक करून दोन वर्षांसाठी तुरुंगात पाठवले.
1955 : पहिल्यांदा टप्पन नावाच्या कंपनीने घरगुती वापरासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन विकण्यास सुरुवात केली.
1960 : न्यूयॉर्कमधील पहिले इलेक्ट्रॉनिक मनगटी घड्याळ बाजारात आले.
1990 : मेघालयचे पहिले मुख्यमंत्री कॅप्टन संगमा यांचे निधन.
2005 : हिंदी लेखक निर्मल वर्मा यांचे निधन.
2009 : बगदादमध्ये झालेल्या दोन आत्मघाती बॉम्बस्फोटात किमान 155 लोक ठार झाले.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/25-october-in-history-india-s-first-post-independence-general-elections-begin-spanish-painter-pablo-picasso-birthday-detail-marathi-news-1222132

Post a Comment

0 Comments