28 October In History : तारापूर येथे भारतातील पहिले अणुवीज निर्मिती केंद्र सुरू झाले, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा जन्म; आज इतिहासात...

27 October In History : इतिहासात प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. या दिवशी झालेल्या घडामोडींचा भविष्यावरही परिणाम होत असतो. भारतीय अणू ऊर्जेच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी तारापूर अणुवीज केंद्राची सुरुवात झाली. त्याशिवाय, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांचा जन्मदिन आज आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही आज वाढदिवस आहे.  युट्यूब'चे सहसंस्थापक जावेद करीम यांचाही जन्म आजच्या दिवशी झाला.

1867 : स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचा जन्म

स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केले. 28 ऑक्टोबर 1867 रोजी जन्मलेल्या निवेदिता यांचे खरे नाव 'मार्गारेट एलिझाबेथ नोबल' होते. मार्गारेट या इंग्रजी-आयरिश समाजसेविका, लेखिका, शिक्षिका आणि स्वामी विवेकानंदांच्या शिष्या होत्या. वयाच्या 30 व्या वर्षी त्या भारतात आल्या. विवेकानंद मार्गारेटला भेटले त्यावेळी त्यांच्या हे लक्षात आले की मार्गारेट भारतीय महिलांच्या उन्नतीसाठी योगदान देऊ शकतात. मार्गारेटने लगेच मान्य केले की भारत ही तिची कामाची भूमी राहिल. तीन वर्षांनंतर जानेवारी 1898 मध्ये मार्गारेट भारतात आल्या. 25 मार्च 1898 रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना दीक्षा दिली आणि भगवान बुद्धांच्या करुणेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली.

1955 :  मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा जन्म

मायक्रोसॉफ्टचे या जगप्रसिद्ध कंपनीचे सह-संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांचा आज जन्मदिन.

मायक्रोसॉफ्ट ही कंपनी पॉल ॲलन आणि बिल गेट्स या दोघांनी मिळून स्थापन केली.काही वर्षातच ही जगातील सर्वात मोठ्या PC (Personal Computer) सॉफ्टवेअर कंपनी बनली.  1987 मध्ये  फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांचे नाव आले आणि अनेक वर्षे ते या यादीत पहिल्या स्थानावर राहिले. भरपूर पैसा असूनही  अत्यंत साधे आणि आरामदायी जीवन जगणारे बिल गेट्स आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कामे आणि सामाजिक सुधारणांवर खर्च करतात. त्यांनी द रोड अहेड आणि बिझनेस @ स्पीड ऑफ थॉट ही दोन पुस्तकेही लिहिली आहेत. कोरोना महासाथीच्या काळात गरीब देशांमध्ये कोविड लसीकरणासाठी त्यांच्या संस्थेने पुढाकार घेतला होता.

1955 : पेप्सिकोच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांचा जन्म

इंद्रा कृष्णमूर्ती नुयी यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1955 रोजी झाला.  सध्या त्या पेप्सिको कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्या जगातील सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक आहे. याशिवाय त्या इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटी, कॅटॅलिस्ट आणि लिंकन सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स बोर्डाच्या सदस्य आहेत.

1969 : तारापूर येथे भारतातील पहिले अणुवीज निर्मिती केंद्र सुरू झाले

भारतातील पहिली अणुभट्टी महाराष्ट्रातील तारापूर येथे आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्राची सुरुवात 1963 मधील भारत, अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजन्सी (आयएईए) यांच्यात 123 करारानुसार झाली.

तारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणूऊर्जा प्रकल्प आहे. 160 मेगावॅट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प 28 ऑक्टोबर 1969 साली सुरू झाला. हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. हे भारतातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र होते. भारत, अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी यांच्यात झालेल्या 123 करारांतर्गत ते कार्यान्वित झाले. कोळसा, वायू, जलविद्युत आणि पवन ऊर्जेनंतर अणुऊर्जा हा भारतातील विजेचा पाचवा सर्वात मोठा स्त्रोत आहे.

1979 : 'युट्यूब'चे सहसंस्थापक जावेद करीम यांचा जन्म.

युट्युबचे सहसंस्थापक  जावेद करीम यांज आज वाढदिवस. जावेद करीम हे अमेरिकन सॉफ्टवेअर अभियंता आणि इंटरनेट उद्योजक आहेत.  YouTube चे सह-संस्थापक असून त्यावर र व्हिडिओ अपलोड करणारे ते पहिले व्यक्ती आहेत. 23 एप्रिल 2005 रोजी अपलोड केलेला "मी अॅट द जू" हा साइटचा उद्घाटन व्हिडिओ, 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत 287 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.

इतर घटना

1900: जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचे निधन.
1627: चौथा मुघल सम्राट जहांगीर यांचे निधन
1811: राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचे निधन.
1958 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जन्म
2013: भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/28-october-in-history-on-this-day-today-in-history-india-first-nuclear-power-plant-bill-gates-birthday-javed-karim-birthday-1223098

Post a Comment

0 Comments