1st December In History : जागतिक एड्स दिवस, बा.सी.मर्ढेकर यांचा जन्म, सीमा सुरक्षा दलाची स्थापना; आज इतिहासात

एक डिसेंबर हा दिवस अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. यामधील एक घटना तशी किरकोळ आहे, पण त्या घटनेनं इतके मोठे रुप धारण केले की इतिहासात नोंद झाली.  1955 मध्ये रोजा पार्क्स नावाच्या एका सावळ्या वर्णाच्या महिला अलाबामा एका बसमध्ये प्रवास करत होती. त्यावेळी तिने गोऱ्या वर्णाच्या सहप्रवाशासाठी सीट सोडण्यास नकार दिला. या प्रकारामुळे तत्कालीन सरकारी नियम आणि नियमांच्या विरोधात वर्तन केल्याप्रकरणी त्या महिलेला दंड ठोठावण्यात आला होता. या प्रकरणाचा अमेरिकेत मोठा विरोध दर्शवण्यात आला. त्यानंतर मार्टिन लूथर किंग जूनियर यांच्या नेतृत्वात सावळ्या वर्णाच्या लोकांनी 381 दिवस बहिष्कार करत विरोध दर्शवला होता. या घटनेसह अनेक महत्वपूर्ण घटनामुळ एक डिसेंबर हा दिवस इतिहासात नोंदवला गेलाय. आजचा दिवस जगभरात जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात.  आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

1761 : मेरी तूसाँ यांचा जन्म (Madame Tussauds )

मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियमच्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचा आजच्याच दिवशी 1761 मध्ये जन्म झाला होता. जेव्हा लंडनमधील संग्रहालये येतात, तेव्हा मादम तुसाद म्युझियमचे (the Madame Tussauds Museum) नाव सर्वात आधी येते. हे संग्रहालय केवळ लंडनमध्येच नव्हे; तर संपूर्ण जगात खूप प्रसिद्ध आहे. लंडनमधील हे एकमेव मेणाचे संग्रहालय आहे. जिथे जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे मेण पुतळे आहेत. भारतामधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे येथे आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, नरेंद्र मोदी, प्रियांका चोप्रा, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक दिग्गजांचे मेणाचे पुतळे येथे आहेत.

1909: बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बा. सी. मर्ढेकर यांचा जन्म

बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसऱ्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.

1917 : महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना

महाराष्ट्र फिल्म कंपनी ही कोल्हापुरात बाबुराव पेंटर यांनी स्थापन केलेली भारतीय चित्रपट निर्मिती कंपनी होती . 1918 मध्ये स्थापित, हा एक मूक चित्रपट स्टुडिओ होता, जो कोल्हापूरचे महाराज शाहू महाराज यांच्या आश्रयाखाली, महाराष्ट्र आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य होता .  7 फेब्रुवारी 1920 रोजी पुण्यात रिलीज झालेला पहिला महत्त्वाचा ऐतिहासिक, सैरंधारी प्रदर्शित झाला. येत्या दशकात फक्त दुसरी मोठी कंपनी दादा साहेब फाळके यांची हिंदुस्थान फिल्म कंपनी होती. 1931 मध्ये टॉकीजच्या आगमनापर्यंत अनेक चित्रपट बनवले , पण 1929 मध्ये व्ही. शांताराम निघून गेल्यावर प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केल्यावर ती कोसळू लागली , शेवटी ती 1931 मध्ये बंद पडली.

1963 : नागालँडची निर्मिती

1963 मध्ये आजच्याच दिवशी नागालँड भारताचे 16 वे राज्य झाले. नागालँडची राजधानी कोहिमा आहे. या राज्याला पूर्वी नागा हिल्स त्वेनसांग या नावाने ओळखले जात होते. नागालँड एक प्राकृतिक सौंदर्याने नटलेले राज्य आहे. ज्याला चारही बाजूंनी पर्वतांनी घेरलेले आहे. नागालँड राज्यामध्ये 100 पेक्षा जास्त अधिक जाती-धर्माचे नागरिक  राहतात. ज्यांची संस्कृती, मान्यता, रीती एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे.

1965 : सीमा सुरक्षा दलाची स्थापना (Border Security Force)

आजच्याच दिवशी 1965 मध्ये सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली होती. बीएसएफ हा भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा भाग आहे.  सीमेपलीकडून होणाऱ्या गुन्ह्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी या दलाची स्थापना करण्यात आली आहे.  खुस्रो फारामर्ज रुस्तमजी सीमा सुरक्षा दलाचे संस्थापक आणि पहिले डायरेक्टर जनरल होते.

1955 : पार्श्वगायक उदित नारायण यांचा जन्म

प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण यांचा आजच्याच दिवशी एक डिसेंबर 1955 रोजी जन्म झाला होता. 90 च्या दशकात उदित नारायण यांनी बॉलिवडूवर अधिराज्य केलेय. आजही 90 च्या दशकातील त्यांची गाणी मंत्रमुग्ध करतात.

1988 : जागतिक एड्स दिवस ( World AIDS Day 2022)

जगभरात एड्स या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे (World AIDS Day) साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या एड्स ग्लोबल कार्यक्रमात काम करणाऱ्या थॉमस नेट्टर आणि जेम्स डब्ल्यू यांनी जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार 1987 मध्ये मांडला होता. त्यानंतर 1988 पासून 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात येतो. एड्स हा असा आजार आहे, ज्यांच्यावर अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही. यापासून बचाव करणं हा या आजारावरील एकमेव उपचार आहे. हा आजार ह्यूमन इम्युनो डेफिशियन्स (HIV) व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी जागरुकता अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई पुन्हा वापरु नये. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे. तसेच एखाद्या व्यक्तीने वापरलेलं ब्लेड शेविंग करण्यासाठी वापरु नये.

1990 :  विजयालक्ष्मी पंडीत यांचे निधन

विजयालक्ष्मी पंडित  या एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी होत्या.त्या महाराष्ट्राच्या ६ व्या राज्यपाल होत्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 8 व्या अध्यक्षा होत्या. या दोन्ही पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या.त्या भारतातील नेहरू-गांधी या प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील सदस्य होत्या. त्यांचे भाऊ जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते, त्यांची भाची इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्यांचे नातू राजीव गांधी हे भारताचे सहावे पंतप्रधान होते.सोव्हिएत युनियन, युनायटेड स्टेट्स आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये नेहरूंचे दूत म्हणून काम केल्यानंतर पंडित यांना भारताचे सर्वात महत्त्वाच्या मुत्सद्दी म्हणून लंडनला पाठवण्यात आले. तसेच भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेचा भाग असलेल्या १५ महिलांमध्ये त्या एक होत्या. आजच्याच दिवशी विजयालक्ष्मी पंडित यांचे निधन झाले.

1992 : गायिका आशा भोसले यांना गदिमा पुरस्कार जाहीर

कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला. एक डिसेंबर 1992 मध्ये आशा भोसले यांना गदिमा पुरस्कार जाहीर कऱण्यात आला.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/1st-december-on-this-day-in-history-world-aids-day-establishment-of-border-security-force-detail-marathi-news-1233412

Post a Comment

0 Comments