Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार केंद्रीय राज्यमंत्री म्हणतात प्रत्येक आईला.....

मुंबई : भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे (Ajit Pawar)  अधेमधे बॅनर्स लागत असतात.. त्यानंतर काही नेत्यांकडूनही अजित पवार मुख्यमंत्री होणार असे दावे केले जातात. अशातच अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांनी माझ्या मुलानं मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केलीय.  पण यावर शिंदे गटानं मात्र अजितदादा लहान असल्याचं म्हटलं. तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) म्हणाले, प्रत्येक आईला आपला मुलगा मोठा व्हावा असे वाटते.  देशांमध्ये लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये कोणीही कुठलेही पद मिळवण्यासाठी इच्छा व्यक्त करू शकतो.

अजित पवार यांच्या आईने माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे यावर  कपिल पाटील म्हणाले,  प्रत्येक आईला आपला मुलगा मोठा व्हावा असे वाटते.  अजित पवरांच्या मातोश्रींनाकाय वाटतं त्याचे उत्तर तेच देऊ शकतात. अजित पवारांना मी  मुख्यमंत्री करू शकतो ना मुख्यमंत्री करण्याच्या सूचना करू शकतो.  मी भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे.  प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. आपल्या पक्षाचा नेता मोठा व्हावा असे बोलण्याचा अधिकार आहे. या राज्यामध्ये या देशांमध्ये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणीही कुठलेही पद मिळवण्यासाठी इच्छा व्यक्त करू शकतो.

एकत्र राहिले आणि दोन महिन्यात एकमेकांचा राजीनामा मागायला लागले

सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे एकमेकांचा राजीनामा मागत आहेत. या प्रश्नावर पाटील यांनी उत्तर देताना म्हटले की, ते  कशासाठी राजीनामा मागतात तेही मला माहिती नाही. अगोदर  एकत्र राहिले  आणि दोन महिन्यात एकमेकांचा राजीनामा मागायला लागले.

सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार

केंद्र सरकारने कांद्याचा भाव कमी करण्यासाठी निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये वितरण सुरू केले आहे.  त्यामुळे त्यामुळे राज्यातल्या कांदा उत्पादन करणाऱ्यांचा तोटा झाला आहे. यावर पाटील यांनी असे म्हटले आहे की, ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्याचा विचार करून पंतप्रधान मोदी कधी काम करत नाहीत.  आताही कंज्युमर ऑफ मिनिस्टर यांच्या वतीने निम्म्या किंमतीने  डाळीचे वितरण संपूर्ण देशामध्ये सुरू झाले आहे. 2014 ला मोदीजींनी  शपथ घेतली त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की माझं सरकार गरिबांना समर्पित आहे.  आत्तापर्यंत गरीब जनतेसाठीच मोदींनी निर्णय घेतले आहेत. गरिबांसाठी त्यांनी अनेक योजना आणल्यात. गरिबांच्या प्रति समर्पित सरकार चालवणारे पंतप्रधान नव्हे तर प्रधान सेवक नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे कांद्याचे भाव कुठे कमी केले, कुठे वितरित केला निवडणुका आहेत तिकडे वितरित केला, तसं नाही तर वितरण संपूर्ण देशासाठी आहे , यामुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान झाले ,शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याचा निश्चितपणे सरकार विचार करेल.

हे ही वाचा :

<a href="https://ift.tt/rALOyuP Pawar On Ajit Pawar : मुलगा मुख्यमंत्री होणार का? अजित पवारांच्या आई म्हणाल्या, "माझ्या डोळ्यादेखत..."

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-kapil-patil-reaction-on-ajit-pawar-will-be-cm-ajit-pawar-mother-maharashtra-news-1225858

Post a Comment

0 Comments