<p>Ashish Shelar Vs Sanjay Raut : मानद डॉक्टर पदवीवरुन राऊतांची टीका, आशिष शेलारांचा पलटवार</p> <p>उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासान विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मानद डॉक्टरेटनं सन्मानित करण्यात आलंय. त्यावरुन शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यात संपूर्ण मंत्रिमंडळ डॉक्टरांचं तयार करा असा टोला राऊतांनी लगावला. राऊतांच्या या टीकेला भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ashish-shelar-reaction-on-sanjay-raut-comment-on-devendra-fadnavis-honorary-doctorate-award-1241290
0 Comments