मोठी बातमी! जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील शाळा आज बंद; गुणरत्न सदावर्तेंचा मात्र आक्षेप

Manoj Jarange Sabha : मनोज जरांगे (<a href="https://ift.tt/qe7JWcl Jarange) यांची आज बीड (<a href="https://ift.tt/Wa5Trnt) जिल्ह्यात इशारा सभा होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने (Education Department ) मोठा निर्णय घेतला आहे. जरांगे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहता बीड शहरातील आज सर्व शाळा बंद (School Closed) असणार आहे. शहरातील मराठी, इंग्रजी माध्यमातील सगळ्याच शाळांना (<a href="https://ift.tt/0tnP7mz) सुट्टी देण्यात आली आहे. बीड शहरालगत आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे आणि यावेळी एकीकडे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केलेला असतानाच शहरांमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली निघणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना कोणताही त्रास होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, असे आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते (<a href="https://ift.tt/HdkJKgN Sadavarte) यांनी केले.

बीडचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांनी शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र पाठवले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, "बीड शहरातील सर्व शाळा 23 डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात यावे. याबाबत दक्षता घ्यावी" असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे बीड शहरात आता एकूण तीन दिवस शाळा बंद असणार आहेत. कारण शनिवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. त्यानंतर रविवारची सुट्टी असेल आणि सोमवारी नाताळ सण असल्याने शासकीय सुट्टी असणार आहे.

गुणरत्न सदावर्तेंचा आदेशाला विरोध...

बीड शहरात आज मनोज जरांगे यांची सभा होणार असल्याने शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण अधिकारी यांनी काढले आहेत. मात्र,"राईट टू एज्युकेशन अधिकारानुसार अशाप्रकारे शाळा बंद ठेवणे गैर आहे. त्यामुळे असा निर्णय घेणारे बीडचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांचे निलंबन केलं पाहिजे अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तसेच, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मध्य भोजनापासून भूके राहावे लागेल. त्यामुळे सदावर्ते यांनी शालेय शिक्षण मंत्री, मराठवाडा विभागीय आयुक्त तसेच शिक्षणाधिकारी यांना पत्र लिहून हा आदेश मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची" मागणी केली आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त...

मनोज जरांगे यांची आज बीड शहरात निर्णायक इशारा सभा होत आहे. 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा याच सभेतून जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे या सभेला बीड जिल्ह्यासह राज्यभरातील मराठा आंदोलक आणि मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सभेसाठी पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सभेसाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. बीड जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशन हद्दीतील पोलिसांना सभेच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले आहे. सोबतच इतर जिल्ह्यातून देखील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची फौज मागवण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी आणि सभेसाठी येणाऱ्या रस्त्यांवर देखील पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे. यासोबतच वाहतूक कोंडी होऊ नयेत यासाठी वाहतूक पोलीस देखील सज्ज असणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

मनोज जरांगें यांची आज बीड जिल्ह्यात 'निर्णायक इशारा सभा'; पुढील आंदोलनाची घोषणा होणार

source https://marathi.abplive.com/news/beed/manoj-jarange-sabha-in-beed-city-all-schools-in-beed-city-closed-objection-of-gunaratna-sadavarte-maratha-reservation-marathi-news-1240126

Post a Comment

0 Comments