Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

मनोज जरांगे आज सकाळी ९ वाजता मुंबईकडे (Manoj Jarange)

मनोज जरांगे आज सकाळी ९ वाजता मुंबईकडे निघणार आहेत. २६ जानेवारीला मुंबईत जरांगे उपोषणाला बसणार असून गावागावांतून मराठा मुंबईकडे रवाना होणार आहे.

महाराष्ट्रात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर (22nd Jan Holiday)

महाराष्ट्रात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, यादिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली होती. त्यामुळे २२ जानेवारी रोजी राज्यातील शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयं आणि आस्थापनं बंद राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधिमंडळात सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधिमंडळात सुनावणी असून अजित पवार गटाच्या वतीने फेरसाक्ष देण्यात येईल शरद पवार गटाचे वकील अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांना सवाल करतील. अजित पवार गटाच्या वतीने नुकतंच जे प्रतिज्ञापत्र विधिमंडळात सादर करण्यात आलेला आहे यामध्ये अजित दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं प्रतिज्ञापत्र. शरद पवार हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे तटकरेंच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख शरद पवार कुठल्याही नेत्याचा ऐकत नव्हते फक्त काही मोजक्या लोकांचा ऐकायचे. शरद पवार यांच्यावरती साधला निशाणा. तटकरे यांच्या प्रतिज्ञापत्राने वाद होण्याची शक्यता

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-live-updates-today-20th-january-2024-national-politics-news-maharashtra-weather-update-maharashtra-ncp-politics-ayodhya-ram-mandir-pran-pratishtha-manoj-jarange-maratha-reservation-protest-update-know-all-updates-1248410
0 Comments