Manoj Jarange Mumbai March Live Update : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगेंच्या (<a href="https://ift.tt/LOxfiaM Jarange) नेतृत्वाखाली निघालेलं भगवे वादळ आता मुंबईच्या (<a href="https://ift.tt/nk9SVyw) वेशीनजीक येऊन ठेपले आहे. मराठा आरक्षण संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकारी आंदोलकांनी जालना (<a href="https://ift.tt/mZuXLOz), बीड (<a href="https://ift.tt/alfo1t3), अहमदनगर (<a href="https://ift.tt/n90mGEd) आणि आता पुणे (<a href="https://ift.tt/juBQ2AR) जिल्ह्याची सीमा ओलांडून मुंबईच्या वेशीवर धडक दिली आहे.

मनोज जरांगेंची नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलाय. सध्या मनोज जरांगे हे वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोहचले असून त्यांच्या सोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत. काल (गुरुवारी) दुपारी लोणावळ्यातुन सुरु झालेला जरांगेंचा प्रवास पहाटेपर्यंत सुरु होता. आज जरांगेंच्या या आंदोलनाचा निर्णायक दिवस माणला जातोय. कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदारपणे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे मुंबईत जाण्यावर ठाम असलेले मनोज जरांगे आज काय भुमिका घेणार याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे. आझद मैदानात मनोज जरांगे यांना उपोषणाची परवानगी नाकारली आहे. दुसकीडे जरांगे मुंबईत जाण्यावर ठाम आहेत.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/manoj-jarange-mumbai-rally-live-updates-today-day-7-maratha-reservation-protest-maharashtra-azad-maidan-mumbai-aarakshan-rally-cm-eknath-shinde-on-maratha-reservation-curative-petition-on-maratha-reservation-hearing-finished-in-supreme-court-marathi-news-1250353
0 Comments