मुंबई : राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) 10 जानेवारीला निकाल द्यावाच लागेल, त्यांना सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) निकाल पाठवता येणार नाही. जर आम्हाला अपात्र केलं तर, आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ, अशी एबीपी माझाला प्रतिक्रिया देत अनिल देसाईंनी (Anil Desai) ठाकरे गटाचा (Thackeray Group) प्लॅन बी सांगितला आहे. तसेच निकालाआधी राहुल नार्वेकर एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) भेटतात कसे? असा सवाल देखील अनिल देसाईंनी उपस्थित केलाय.

निकाल आमच्या बाजुनेच लागेल जर, नाही लागला तर जनतेचा लोकशाहीवर लोकांचा विश्वास राहणार नाही. याचा परिणाम निवडणुकांवरही होईल. शिवसेना कोणाची याचं उत्तर सगळ्यांना माहित आहे. ठाकरेंनी एबी फॅार्म देण्यापासून ते प्रतोदचा व्हिप मान्य करण्यापर्यंत काय काय झालं हे लोकांना माहितेय, त्यामुळे निर्णय आमच्या विरोधात कसा लागेल, अशी प्रतिक्रिया अनिल देसाईंनी एबीपी माझाला दिली.

अवघ्या काही तासांत आमदार अपात्रतेचा निर्णय लागणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आममदारांच्या अपात्रेचा निकाल तयार झाला आहे. 10 तारखेला 4 वाजता निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. याच निकालावर दिल्लीतील तज्ज्ञांकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत अशी माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्ज्ञांकडे पाठविला असल्याची माहिती देखील मिळतेय. निवडणूक आयोगाने शिवसेनेतील (Shiv Sena) वादात शिंदे गटाच्या बाजूले कौल दिला होता. निवडणूक आयोगाच्या आदेशाचाही आधार घेण्यात आल्याचे कळतंय.

राहुल नार्वेकर-मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी (7 जानेवारी 2024) वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. दोघांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र 10 जानेवारीला नार्वेकर आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल देणार असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. आपआपली केस अधिक मजबूत करण्यासाठी त्यानुसार दोन्ही गटाच्या आमदारांनी साक्ष दिली. यानंतर उलट तपासणी दरम्यानह आपली भूमिका कायद्याला धरून होती हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार? त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेवर राहुल नार्वेकर काय निर्णय देणार आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा कोणता भूकंप होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा :

<a href="https://ift.tt/yKcl4u1 Disqualification: कौल कोणाला? विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात होणार निर्णय, अवघ्या काही तासांत राज्याच्या राजकारणाचं भविष्य ठरणार

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-mla-disqualification-case-if-we-are-disqualified-we-will-approach-the-supreme-court-anil-desai-told-thackeray-group-plan-b-detail-marathi-news-1245173
0 Comments