Manoj Jarange Mumbai Protest : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे (<a href="https://ift.tt/6GZUizs Jarange) रविवारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (<a href="https://ift.tt/GAyHNpP Fadnavis) यांचा मला मारण्याचा डाव असून, मला सलाईनमधून विष देण्यात येणार असल्याचा खळबळजनक दावा देखील जरांगे यांनी केला. फडणवीस यांना मला मारायचेच असेल तर मी त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन मरतो असे म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आंतरवालीपासून निघालेले जरांगे रात्री भांबेरी गावात पोहचले. मात्र, गावकऱ्यांनी त्यांना तिथेच मुक्काम करण्याचा आग्रह केल्याने जरांगे रात्री तिथेच थांबले असून, आज सकाळी पुन्हा 11 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहेत.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/manoj-jarange-mumbai-march-live-update-manoj-jarange-march-to-devendra-fadnavis-sagar-bungalow-mumbai-for-maratha-reservation-cm-eknath-shinde-maratha-aarakshan-antarwali-sarathi-marathi-news-1259428
0 Comments