मुंबई :  महाराष्ट्रात पेटलेला आंदोलनांचा वणवा आणि मनोज जरांगे आणि मराठा बांधवांचा आक्रमक पाहता, सरकारने एकदिवसीय अधिवेशन घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली लावल्याचा दावा केला जातोय. मात्र, मनोज जरांगे (Manoj Jarange) अजूनही समाधानी झालेले नसून, त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारलाय. आजपासून गावोगावी सकाळी 10.30 पासून रास्तारोको आंदोलन करा, दुपारी एक वाजेपर्यंत रास्तारोको करा, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय. आंदोलन करताना सावध राहा, व्हिडिओ शुटींग करा असा सल्लाही जरांगेंनी दिलाय. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जरांगेंच्या आंदोलनावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीये. जनतेला त्रास होईल असं आंदोलन कुणीही करू नये असं फडणवीस म्हणाले.

मनोज जरांगे यांनी सगयासोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आजपासून आंदोलनाची हाक दिलीय. आज राज्यभरात एक दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेमुळे आज आंदोलनाची वेळ बदलून 11 ते 1 करण्यात येणार असून पुढे याच रास्ता रोको आंदोलनाचे रूपांतर धरणे आंदोलनात करण्यात येणार आहे. 25 फेब्रुवारीपासून राज्यभरात गावागावात ग्रामपंचायत किंवा मंदिरासमोर धरणे आंदोलन करण्याचे अवाहन जरांगे यांनी केलंय. तसचं 25 पासून होणाऱ्या धरणे आंदोलना दरम्यान दररोज आपल्या सगयासोयऱ्याच्या मागण्यांचे निवेदन शासनाच्या प्रतिनिधीला द्यायचे आहे, हे निवेदन गावात 10 च्या आत शासनाचा प्रतिनिधी आला पाहिजे तो न आल्यास ,रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.

पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस जारी

बीड, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, सोलापूर, लातूर, नाशिक, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यात पाटील यांनी राज्यभर विविध ठिकाणी एक दिवसीय रास्ता रोकोच्या सूचना मराठा बांधवांना केलेल्या आहेत. त्यामुळे याचा परिणाम राज्यात विविध ठिकाणी होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी आवाहन केलेल्या आजच्या रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोकांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस जारी करण्यात आली आहे. CRPC 149 अन्वये नोटीस जारी केली आहे. नोटीस कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे सरकरची डोकेदुखी वाढणार

मनोज जरांगे यांनी आतापर्यंत आमरण उपोषणाचा मार्ग वापरला होता. मध्यंतरीच्या काळात राजकीय नेत्यांना गावबंदीही करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्याची हाक दिल्याने सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

<a href="https://ift.tt/WAeEF4s baraskar : अजय बारसकरांवर मुंबईत हल्ल्याचा प्रयत्न, मराठा बांधव आक्रमक; सुरक्षेत वाढ

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/manoj-jarange-new-movement-from-today-rasta-roko-will-be-done-from-village-to-village-maharashtra-marathi-news-1258925
0 Comments