<p><strong>Nashik Crime</strong> : नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. <a title="नाशिक" href="https://ift.tt/achDNep" data-type="interlinkingkeywords">नाशिक</a>मध्ये शुक्रवारच्या मध्यरात्री एका खासगी डॉक्टरवर प्राणघातक हल्ला झाला आहे, पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळेस ही घटना घडली आहे. हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागातच डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून हल्लेखोर मात्र फरार आहे. घटनेची माहिती समजताच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.</p>
source https://marathi.abplive.com/news/nashik/maharashtra-nashik-crime-marathi-news-attack-on-private-doctor-in-nashik-assailant-absconding-night-incident-in-hospital-1258916
0 Comments