Top 100 News : शंभर हेडलाईन्स : वेगवान बातम्यांचं आढावा : 25 फेब्रुवारी 2024 : ABP Majha

उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन असून राज्य मंत्रिमंडळाची बैठक.

अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद होणार असून सर्व विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार.

रस्तारोको आंदोलनाचं धरणे आंदोलन आणि साखळी उपोषणात रूपांतर करा, मनोज जरांगेंचं आवाहन, आज कोण कोण राक्षस आहेत, हे जाहीर करेल, जरांगेंचं वक्तव्य.

मनोज जरांगेंच्याया सर्व मागण्या शासनाला मान्य, सगेसोयरे बाबतच्या मागणीवर सरकार सकारात्मक, काही कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती.

कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकार आरक्षण देताय, त्यामुळे कायदा हातात घ्यायची गरज नाही, नाव न घेता छगन भुजबळांचा जरांगेंना टोला.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-top-100-news-superfast-maharashtra-news-25-february-2024-maharashtra-budget-2024-mva-manoj-jarange-maharashtra-politics-abp-majha-1259176
0 Comments