Aaditya Thackeray Full Speech Dadar : शब्द देतोय, UAPA लावणार, अटक करणार, सरवणकरांना इशारा

Aaditya Thackeray on Sada Sarvankar दादर, दक्षिण मध्य मुंबई : "आज मी इथून आमदारांना (सदा सरवणकर) सांगत आहे. आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत तुम्ही बंदुक काढली. तुमच्यावर अतिरेक्याचा कायदा युएपीए मी टाकणार आहे. तुम्हाला सोडणार नाही. पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही फायरिंग केलंय. तु्म्ही पोलिसांवर फायरिंग केलं, तुम्हाला अतिरेक्यासारखं आतमध्ये टाकणार आहे. हा मी तुम्हाला शब्द देतोय", असा इशारा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (<a href="https://ift.tt/dRixXbT Thackeray) यांनी दादरचे आमदार सदा सरवणकर (<a href="https://ift.tt/s6NBtZU href="https://ift.tt/QojGW3y) यांना दिला. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे ठाकरेंचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

ध्रुव राठींसारख्या लोकांनी याचं सगळं समोर आणलं

आदित्य ठाकरे म्हणाले, ही निवडणूक (सदा सरवणकर) त्यांची नाही. त्यांना महत्व द्यायचे नाही. त्यांना इशारा पुरेसा आहे. गेल्या दहा वर्षात महागाई वाढत गेली. प्रधानमंत्री आवास योजनेत कोणाला घरं मिळाली नाहीत. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख देतील असे आश्वासन दिले होते, मात्र एकाच्याही खात्यात आले नाहीत. त्यांच्या खात्यात 50 खोके आले असतील. आपल्याकडे काही 15 लाख आले नाहीत. खोटं बोला रेटून बोला, खोटं बोला रडून बोला, हे यांचे धोरण आहे. ध्रुव राठींसारख्या लोकांनी याचं सगळं समोर आणलं आहे. आपल्या व्हाट्सअॅपवर येऊ लागलं आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-aaditya-thackeray-targets-sada-sarvankar-during-dadar-speech-1282244
0 Comments