ABP Majha Headlines : 06:30 AM : 17 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 06:30 AM : 17 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज महायुतीची सांगता सभा , पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार.. भाजपकडून सभेचा टीझर जारी

आज मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा.. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगेंसह  अरविंद केजरीवालही  उपस्थित राहणार

४ जूननंतर देश 'डिमोदीनेशन' होणार, तर दोन वर्षांनंतर मोदीच निवृत्त होणार , एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

३० वर्षात भाजपमध्ये विलीन झालो नाही तर आता काँग्रेसमध्ये कसं विलीन होणार, विलीनीकरणाच्या चर्चांवरुन उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार

भाजपसोबत न जाण्याची अट राऊतांनी अमान्य केल्यानं चर्चा फिस्कटली, प्रकाश आंबेडकरांचा 'माझा'वर गौप्यस्फोट,
तर भाजपसोबत चर्चेची दारं बंद करणार नाही.. राऊतांची भूमिका... आंबेडकरांचा मोठा दावा

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील महायुतीचे अनधिकृत बॅनर हटवले, नरेंद्र मोदींच्या अनधिकृत बॅनरवर निवडणूक आयोगाची कारवाई.

नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी, माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही, मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना टोला

मोदींचा आत्मविश्वास ढासळल्यानं धर्माच्या आधारे टीका करतात ,.,, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा..

घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला बेड्या, राजस्थानातल्या उदयपूरमधून मुंबई पोलिसांकडून अटक.

मुंबई, पुणे, नागपूरमधील होर्डिंग्जचा एबीपी माझाकडून रिअॅलिटी चेक.. होर्डिंग्जचं कोट्यवधी रुपयांचं अर्थकारण समोर

राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर..ठाणे, नवी मुंबईत पावसाची हजेरी.. तर जव्हार, मोखाडाला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-10-pm-17-may-2024-maharashtra-news-marathi-news-maharashtra-politics-pm-modi-sabha-1282530

Post a Comment

0 Comments